शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीनचाकीचे स्टिअरिंग तुमच्या हाती, पण सवारीमुळे भरकटले; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 05:06 IST

; सरकार पाडण्यात रस नाही

विशेष प्रतिनिधी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग तुमच्या हाती आहे; पण रिक्षात बसलेले प्रवासी तुम्हाला कधी उत्तरेकडे, कधी दक्षिणेकडे नेतात, कोणी ब्रेक दाबतंय, कुणी मधेच हॉर्न वाजवत असल्याने सरकार भरकटलं आहे. हे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही पण तुम्ही सरकार चालवून तरी दाखवा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते. एकमेकांच्या तंगड्या तोडणारं हे सरकार अंतर्विरोधाने पडेल. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. बेईमानीने बनलेले सरकार आहे. कोरोनावर मात करण्यात सरकार अपयशी ठरत असून टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. दूधप्रश्नी १ आॅगस्टपासून राज्यभर आंदोलन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. ऊस, साखरप्रश्नी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत टिपण्णी केली आहे. पण साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राने स्थापन केलेल्या मंत्रिगटाचे प्रमुख अमित शहा आहेत हे मुख्यमंत्र्यांना माहिती असू नये?, असा सवाल त्यांनी केला.

आता स्वबळावर सत्ताराज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भविष्यात स्वबळावर सत्ता आणण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. कोरोनाचा मुकाबला करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले असून हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेसमोर प्रभावीपणे मांडावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी