शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

जगाचा पोशिंदा संकटात, तीन वर्षांत दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 6:49 PM

राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे.

गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात  याच कालावधीत आॅक्टोबर अखेरपर्यंत ३ हजार १९०  कर्जबाजारी शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासनाच्याच अहवालात स्पष्ट झाले. दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

सलग दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज तसेच अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगावं कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा हा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा आहे. त्यामुळे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवली जाते. ३१ आॅक्टोबर २०१८ च्या अहवालानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात  ३१९० शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार, अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत १४ हजार ५१२ कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत.  यापैकी ६ हजार ४५१ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, ७ हजार ८७९ अपात्र ठरली.  १८२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

कर्जमाफीच्या १५३ दिवसांत ४९९ शेतकरी आत्महत्याशासनाने जून महिन्यात शेतकºयांचे कर्ज माफ करण्याचा निर्र्णय घेतला. १३ लाख ७६ हजार ९१० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले. या पाच महिन्याच्या काळात म्हणजेच १५३ दिवसांत ४९९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या काळात दर सात तासात एका शेतक-याने मृत्यूचा फास गळ्यात घातला आहे. जून महिन्यात ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे.

२००१ पासून १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्याविभागासह वर्धा जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यात ९३, फेब्रुवारी १०५, मार्च ११२, एप्रिल ८२, मे ९७, जून ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहेत. यामध्ये अमरावती विभागात ९०३, तर वर्धा जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. वातावरण बदलामुळे कृषिक्षेत्रच धोक्यात आले आहे. यावर शासनाचे प्रयत्न चुकीच्या दिशेने होतात. त्यामुळे खरा लाभार्थी वंचित राहून आर्थिक स्तर खालावला आहे. शेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी वरवरची मलमपट्टी न करता दीर्घकालीन उपाययोजना हव्यात. उद्धवराव फुटाणे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Farmerशेतकरी