शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकासाचे तीन हजार कोटी कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 03:20 IST

कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ - कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे.आदिवासी युवकांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून शबरी आर्थिक विकास महामंडळ कर्ज उपलब्ध करून देते. मात्र या महामंडळाकडेच निधी नाही. त्यांची हमी घेण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे या मंडळाला कर्जच उपलब्ध झाले नाही. गेल्या चार वर्षांपासून मंडळाकडे लाभार्थी कर्जासाठी नुसत्या चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. आदिवासी विकास विभागाकडून डिझेल इंजिन आणि पीव्हीसी पाईपची योजना आदिवासी शेतकरी बांधवासाठी राबविली जात होती. ही योजना आता कृषी विभागाकडे वळती करण्यात आली. मात्र कृषी विभागाला लाभार्थीच मिळाले नाही. त्यामुळे ही योजनाही पूर्णत: कोलमडली आहे. हा निधीही शासनाकडे परत जाणार आहे.राज्यात सत्तांतर होताच, खावटी कर्ज देणे बंद करण्यात आल्याने आदिवासींचा आधार गेला होता. आता मोठी आर्थिक कपात झाल्याने विकासच ठप्प होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुरीची डाळ घेणार कोण?महामंडळाने गत दोन वर्षात १६ हजार ५०० क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची डाळ करण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली. मात्र, ही डाळ आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांना विकता येणार नाही. तसे सुधारित आदेशच वसतिगृहात धडकले. यामुळे तुरीची गुणवत्ता घसरल्यास महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. सरकारच्या या धोरणाविरूद्ध मंडळाचे संचालक भारत दुधनाग, अशोक मंगाम, मिनाक्षी वेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.सरकार आदिवासींविरोधात काम करीत आहे. महामंडळाच्या तीन हजार कोटींची कपात झाली. हा प्रकार आदिवासींचे खच्चीकरण करणारा आहे. - सुनील भुसार, संचालक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :MONEYपैसाBudgetअर्थसंकल्प