शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘बी.ए.4’ चे तीन, तर ‘बी.ए.5’ व्हेरिएंटचा एक रुग्ण; गृह विलगीकरणात झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:20 IST

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे.

मुंबई :

कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे या कालावधीतील असून त्यातील दोन ११ वर्षांच्या मुली, तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात बरे झाले असून  या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही, हा मोठा दिलासा आहे. आजही रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्राॅन कुटुंबातील विषाणू आहेत. त्यामुळे त्याच्या वाढीला मर्यादा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडील तिसरी लाट ही ओमायक्रोनमुळेच आलेली होती. मात्र, तरीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे आणि अतिजोखमीच्या आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

का वाढ झाली? - कोरोनाची साथ आता एन्डॅमिक झाली आहे. याचा अर्थ अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहतील.- सध्या आढळणाऱ्या रुग्णांना सौम्य संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.काय काळजी घ्यावी? -  नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा- राज्यात मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये

राज्यात १७ हजारांहून अधिक रुग्णराज्यात सोमवारी १८८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात  ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७७,४७,१११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात  १७,४८० रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९७.९१% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ८,१३,४६,२०४ नमुन्यांपैकी ०९.७३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१२,४६२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ इतका आहे. दिवसभरात नोंद झालेल्या मृतांमध्ये रायगड जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस