शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Naxalites Encounter : 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी चकमकीत ठार; पोलिसांच्या C60 दलाला मिळाले मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 11:48 IST

Naxalites Encounter : अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.

महाराष्ट्र (Maharashtra) दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना मोठे यश मिळाले. गडचिरोली येथे चकमकीत 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी (Naxali) ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 दलाला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. 

अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 38 लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना ठार मारल्याच्या घटनेवर भाष्य केले. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 दलाने गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार केले आणि या त्यांच्या धाडसी पावलाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचे C60 जवान आणि फोर्स सातत्याने मोठे शौर्य दाखवत आहेत. आपण गडचिरोलीचा विकास करु शकतो. आज मी तिकडे जात आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी तिथे कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की नक्षलवाद्यांचे पेरिमिली आणि अहेरी दलमचे सदस्य माने राजाराम आणि पेरिमिली सशस्त्र चौकी दरम्यानच्या जंगलात तळ ठोकून आहेत. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांच्या C-60 दलाच्या दोन तुकड्या जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आल्या. 

पोलिसांच्या पथकाने दिले प्रत्युत्तर एसपी म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी आमच्या टीमवर गोळीबार केला, ज्यावर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीनही नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. यासोबतच शस्त्रे आणि इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात मृतांपैकी एकाची ओळख पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी आहे. तर पेरिमिली दलमचा वासू आणि अहेरी दलमचा श्रीकांत अशी आणखी दोघांची नावे आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र