शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:15 IST

साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा लागणार आहे

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा लागणार आहे.देशात २५० लाख टन साखरेची गरज असताना ३२० लाख टन उत्पादन जादा झाल्याने साखरेचे दर गडगडले. ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. मे महिन्यात २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या निर्णयाचाही त्यामध्ये समावेश आहे. या निर्णयानुसार देशातील ५२८ कारखान्यांना साखरेचा निर्यात कोटा ठरवून देण्यात आला होता. ३० सप्टेंबरपर्यंत ही साखर निर्यात करावयाची होती. मात्र, जागतिक बाजारातही साखरेचे दर घसरलेले असल्याने आतापर्यंत अवघे चार लाख ८० हजार टन साखर निर्यातझाली आहे.निर्धारित लक्ष्य पूर्ण होत नसल्याने केंद्र शासनाने साखर निर्यातीला गुरुवारी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. तसेच गाळप केलेल्या प्रतिटन साखरेपैकी ७.१४ किलो साखर निर्यात करण्याचे लक्ष्य दिले आहे. ही साखर २०१७-१८च्या हंगामातील तसेच नव्या २०१८-१९च्या हंगामात उत्पादित झालेली असली तरी चालणार आहे. याचाच अर्थ पुढील हंगामातही साखर निर्यात चालू राहणार आहे.जागतिक बाजारात साखरेचा दशकातील नीचांकअमेरिकेत २० आॅगस्ट रोजी साखरेचे भाव ९.९८ सेंट इतके घसरले. २१ रोजी ते ९.९९ सेंट इतके होते. १० सेंटच्या खाली साखर आल्याने तो चालू दशकातला नीचांकी दर ठरला आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये हा दर १०.१३ सेंटपर्यंत खाली आला होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये हाच दर २३.९० सेंटवर जाऊन पोहोचला होता. १० ते ११ सेंटच्या दरम्यान दर असल्यास भारतीय चलनात तो १४५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा पडतो. यामुळे साखर उद्योगाची चिंता आणखी वाढली आहे.