कारंजा (जि़ वाशिम) : विवाहसंबंध जुळवून ठाण्याकडे येणारी स्कॉर्पिओ ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात महिलेसह ३ जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला़ ही घटना नागपूर - औरंगाबाद महामार्गावरील दोनद बुद्रूक गावाजवळ सोमवारी सायंकाळी ४च्या सुमारास घडली. ठाण्यातील लक्ष्मीनगरचे रहिवासी वर्धा जिल्ह्यातील पूलगाव येथील त्यांच्या मामाच्या मुलाचा विवाहसंबंध जुळवून स्कॉर्पिओने घराकडे परतत होते़ दरम्यान, दोनद बुद्रूकजवळ ट्रकला स्पॉर्किओने मागून जोरदार धडक दिली. यात स्कॉर्पिओतील शकुंतला प्रभाकर कांबळे (५५), दिनेश बाळू कात्रेकर (२८) आणि चालक रूपेश घोले (२५) यांचा जागीच मृत्यू झाला़ सुरेश प्रभाकर कांबळे (२२) हा जखमी झाला असून, त्याच्यावर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात स्कॉर्पिओचा अक्षरश: चुराडा झाला. (प्रतिनिधी)
अपघातात ठाण्याचे तीन ठार
By admin | Updated: February 3, 2015 01:34 IST