शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून तिघांचा मृत्यू; शेतकऱ्यासह बालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 22:22 IST

पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झोपडीत आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीवर कोसळली.

नागपूर (रामटेक) : पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झोपडीत आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीवर कोसळली. त्यामुळे होरपळलेल्या तिघांचा झोपडीतच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रामटेक शहरात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पाेलीस पाटील, मजूर व गुराख्याचा तर जखमींमध्ये शेतकरी व १२ वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना चोरखुमारी (ता. रामटेक) शिवारात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

योगेश अशोक कोकण (३०), मधुकर सावजी पंधराम (५५) दोघेही रा. चोरखुमारी, ता. रामटेक व दिलीप मंगल लांजेवार (४२, रा. डोंगरी, ता. रामटेक) अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये हरिसिंग धोंडबा सरोते व नेहाल रामसिंग कुमरे (१२) दोघेही रा. चोरखुमारी, ता. रामटेक यांचा समावेश आहे.हरिसिंग सरोते यांची गावातगत शेती असून, त्यांनी पोलीस पाटील योगेश कोकण यांचा ट्रॅक्टर मशागतीसाठी किरायाने घेतला होता. दिलीप लांजेवार यांच्या शेतात कामाला होते तर मधुकर पंधराम व त्यांना नातू नेहाल शेतालगत त्यांच्या गाई चारत होते. दरम्यान, दुपारी ३ वाजताच्या सुमाराच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या सर्वांनी शेतात असलेल्या झोपडीत आश्रय घेतला.

त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीच्या मध्यभागी कोसळली. यात झोपडीतील सहाही जण होरपळल्याने गंभीर जखमी झाले. शिवाय, योगेश कोकण, मधुकर पंधराम व दिलीप लांजेवार यांचा झोपडीतच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच देवलापार (ता. रामटेक) पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. 

त्यांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्या दोघांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेमुळे चोरखुमारी गावात शोककळा पसरली होती. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरramtek-acरामटेक