शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात तीन ठार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील घटना : इनोव्हा कारचा टायर फुटून पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:16 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडून पुण्याकडे जाणाºया कारचा मागचा टायर फुटल्याने गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी मारून पुण्याकडून मुंबईला निघालेल्या कारवर आदळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडून पुण्याकडे जाणाºया कारचा मागचा टायर फुटल्याने गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी मारून पुण्याकडून मुंबईला निघालेल्या कारवर आदळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.बुधवारी सकाळी ९.३०च्या सुमारास मुंबई लेनवरून कारमधून ९ जण अ‍ॅडलॅब इमॅजिक पार्ककडे जात असताना खालापूर टोल प्लाझाजवळ कारचा उजव्या बाजूचा मागचा टायर फुटला. पहिल्या लेनवरून चाललेल्या कारच्या वेगाला अचानक ब्रेक लागला व ती उलटून मधोमध असलेल्या वायर बॅरियर्सना तोडून पुणे लेनवर गेली. त्याच वेळी पुण्याकडून मुंबईला निघालेल्या रिट्झ कारवर ती आदळली. या वेळी रिट्झ कारमध्ये असलेल्या अनंत नरेंद्र पारीख (५५ पुणे) यांचा मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. इनोव्हा कारमधील अस्मित तावडे (१९, रा. घाटकोपर), शुभम बोराडे (१९, रा. विक्रोळी) हे जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी झाले होते. आयआरबी पेट्रोलिंग व डेल्टा फोर्सच्या जवानांनी रिट्झ कारमधल्यांना बाहेर काढले. जखमींना कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात हलवले. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.अपघातातील जखमी-जखमींमध्ये राम प्रसाद (५०), आनंद पारीख (४०) (दोघेही राहणार पुणे) रिट्झ कारमध्ये होते तर सुभाष पलांडे (१९, रा. मुंबई), आदित्य आचार्य (२२, रा. विक्र ोळी), शुभम सरोज, सोहेल शहा, मोहोमद अझीझ हे इनोव्हा कारमध्ये होते.

टॅग्स :Accidentअपघात