शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 05:50 IST

नापिकी आणि पीककर्ज न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एका शेतकºयाने मृत्यूला कवटाळले.

औरंगाबाद : नापिकी आणि पीककर्ज न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील एका शेतकºयाने मृत्यूला कवटाळले.माहूर (जि. नांदेड) तालुक्यातील मालवडा येथील सुभाष भोपा जाधव या अल्पभूधारक शेतकºयाने सततची नापिकी, राष्ट्रीयीकृत बँकेचे थकित कर्ज व बँकेत चकरा मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने रविवारी दुपारी ४ वाजता स्वत:च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तालुक्यात एकमेव असलेल्या एस.बी.आय. बँकेकडे मागील दोन महिन्यांपासून अनेक शेतकºयांचे पीककर्ज प्रलंबित आहे. ३० जुलै रोजी मयताचे मोठे बंधू अशोक भोपा जाधव यांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन शासनाच्या शेतकरी आत्महत्या योजनेतून कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.मुखेड तालुक्यातील सलगरा बु. येथील शेतकरी शेख तय्यबसाब उमेदअली (५०) यांनी दोन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून सोमवारी पहाटे विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांनी काही लोकांकडून खाजगी कर्ज घेतले होते. मुलगा व पत्नी नेहमीच आजारी पडत असल्याने खाजगी लोकांचे कर्ज फेडायचे कसे, या चिंतेने ते ग्रासले होते़ त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

रेल्वेसमोर उडी घेतलीसततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून मुंजाजी बापूराव बोकारे (६५) या शेतकºयाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ च्या सुमारास फुकटगाव (जि़ परभणी) परिसरात उघडकीस आली़ बोकारे यांना फुकटगाव शिवारात अडीच एकर शेती आहे़ त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे एक लाख रुपयांचे कर्ज होते़ चार वर्षांपासून शेती पिकत नव्हती़ बँकेचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना होती़ यातूनच मुंजाजी बोकारे यांनी सोमवारी फुकटगाव शिवारात कोणत्या तरी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली़ ही घटना सायंकाळी ६़४५ च्या सुमारास उघडकीस आली़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या