शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

जनावरांच्या हाडापासून पावडर तयार करणारे तीन कारखाने सिल

By admin | Updated: July 27, 2016 20:13 IST

जनावरांच्या हाडापासून पावडर आणि तेल तयार करणारे तीन अनधिकृत कत्तल कारखाने बंद करण्याचे आदेश तेजस चव्हाण यांनी दिल्यानंतर बुधवारी तिन्ही कारखान्यांना सिल ठोकले आहे.

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. २७ :  तालुक्यातील पिंपरी, चिलवडी परिसरातील जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे तीन कारखाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात तहसीदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.

उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी तसेच चिवडी परिसरात जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे कारखाने सुरू आहेत. सदरील उद्योगामुळे उग्र वास येत असल्याची तक्रार पिंपरी, सुर्डी, झरेगाव, वलगुड, जुनोनी, राघुचीवाडी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. एवढेच नाही तर उग्र वासामुळे मजूरही शेतीमध्ये काम करण्यास येत नव्हते. मांस आणि हाडांमुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. या मोकाट कुत्र्यांनी अनेक शेतकरी, तसेच जनावरांचे लचके तोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

एवढेच नाही तर मांस आणि हाडे वाहून आणणारी वाहनेही वलगूड येथील तलावामध्ये धुतली जात असत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी दुर्गंधीयुक्त बनले होते. असे दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन काही शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याबाबतच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या पथकाने संयुक्तरित्या चौकशी केली असता यातील तीन कारखाने अनधिकृतरित्या सुरू असल्याचे निदर्शनास आले.

त्यांना लातूर येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची मंजुरीही नव्हती. दरम्यान, याची गंभीर दखल घेत तेजस चव्हाण यांनी १२ जुलै रोजी संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेले मुद्येशीर कुरेशी यांचे मे. अलकुरेश बोन मिल, अलिम कुरेशी यांचे मे. एमन एंटरप्रायजेस तर संमती पत्रातील नियम व अटींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत मे. सिफा बोन मिल अ‍ॅड फर्टीलायझर्स पिंपरी हे कारखाने सील केले. दरम्यान, अटींचे पालन न केल्याप्रकरणी अन्य दोन कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, त्यांची नावे समजू शकली नाहीत.

शंभरावर पोलिस कर्मचारीअनधिकृतरित्या चालविण्यात येणाऱ्या कारखान्याविरूद्ध कारवाई करताना कुठल्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तहसील प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे शंभरावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे कारखाना परिसराला छावनीचे स्वरूप आले होते.