शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात आज कोरोनामुळे तीन मृत्यू, १४० जण पॉझेटिव्ह ,९० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:38 IST

यवतमाळमध्ये गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 90 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा  समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 140 जणांमध्ये 87 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 45 रुग्ण, पुसद 32, दारव्हा 19, बाभुळगाव 14, महागाव 8, पांढरकवडा 6, वणी 5, दिग्रस 3, घाटंजी 3, कळंब 2, उमरखेड 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे.गुरूवारी एकूण 1371 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1343 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16856 झाली आहे. 24 तासात 90 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15059 आहे. तर जिल्ह्यात एकूण 454 मृत्युची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 158453 नमुने पाठविले असून यापैकी 156950 प्राप्त तर 1503 अप्राप्त आहेत. तसेच 140094 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस