शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात २४ तासांत तीन मृत्यू; मराठवाड्यात पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 05:52 IST

कोरोनाचा वाढता उद्रेक : पुणे जिल्ह्यात बाधितांची संख्या शंभरीपार

पुणे : पुण्यात कोरोना विषाणूचा उद्रेक अचानक वाढला. एकाच दिवसांत २१ नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात १७ आणि पिंपरी-चिंचवडमधील चार रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. पुण्यात २४ तासांत तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

शहरात मागील ३ दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मृत्यू होणाऱ्या नागरिकांना आधीपासून काहीतरी आजार होता. नंतर कोरोनाची लागण झाली. त्यात या लोकांचा मृत्यू झाला. पुण्यात २४ तासांत तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित ६० वर्षीय महिलेचा आणि ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर ६९ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध महिलेचाहीमृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या महिलेला पित्ताशयाचा आजार होता.

६० वर्षीय महिलेवर यापूर्वी नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्वच्छता सेवकाचे सोशल डिस्टन्सिंगपुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रूग्णालयात स्वच्छतेचे काम करणारे सेवक देखील आपल्या घरी आल्यानंतर कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेत आहेत. घराबाहेरच चहा घेताना त्यांचे टिपलेले छायाचित्र.कोरोना संशयित दोघांचा जळगावात मृत्यूजळगाव : कोरोना झाल्याच्या संशयावरून कोरोना कक्षात दाखल असलेल्या दोन जणांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. यात ६५ वर्षीय वृद्ध महिला आणि ३३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यांना अन्य व्याधी असल्याचेही समोर आले आहे़ दोघांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.श्वास घ्यायला त्रास होत असल्याने या महिलेस शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल केले होते. नमुने घेतल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला़ त्यांना मधुमेह, रक्तदाब व दमा हे विकार होते़ तर तरूणाला प्राथमिक स्तरावर न्युमोनियाची लागण झाल्याचे समोर आले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या