अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील कुरणवाडी - पोलवाडी शिवारात वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना अडीच वर्षाची मुलगी, चार वर्षांचा मुलगा आणि काही अंतरावर ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास आढळून आला. या तिघांचा गळा दाबून खून केला असल्याचा दावा एका पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. वनरक्षक बालासाहेब जनार्दन नागरगोजे हे गुरुवारी कुरणवाडी, पोलवाडी शिवारात वृक्षांची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथे उपरोक्त तिघांचे मृतदेह त्यांना दिसून आले़ त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. मृतावस्थेत सापडलेले तिघे माय- लेकरे असतील, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
अंबाजोगाईमध्ये महिलेसह तिघांचे मृतदेह आढळले
By admin | Updated: January 2, 2015 01:32 IST