शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

साडेतीन लाख नवमतदार नोंदणी; राज्यात ठाण्याचा प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:13 IST

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला राष्ट्रीय मतदार दिन

ठाणे : येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. यावेळी ठाण्यातील नवमतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली. एवढेच नव्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मराठी चित्रपट, मालिका कलाकारांनीदेखील आपल्यावरील मतदानाविषयी निरुत्साही असण्याचा शिक्का पुसून काढून मतदान यादीत नाव नोंदविल्याचा तसेच मतदान करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागानेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वॉर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा. मी नाव नोंदवूनदेखील ते मतदार यादीत आले नव्हेत किंवा कसे गायब झाले कळले नव्हते, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा करून आपले नाव पुढील वेळेस कसे मतदान यादीत येईल, हे पाहिले.अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुम्ही जर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाही, त्यामुळे हे कर्तव्य तुम्ही बजावलेच पाहिजे. ज्या व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावत नाही, त्याना प्रस्थापित सरकारच्या विरोधात बोलण्याचा अजिबात हक्क नाही किंबहुना मतदान न केल्यामुळे तुम्ही तो गमावता असे ते म्हणाले. यावेळी कलाकारांना निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यिक्षक दाखिवण्यात आले.युवा मतदारांसाठी घेतलेल्या निबंध, वक्तृत्त्व, रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या मुलांनी पथनाट्य सादर केले. तर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील नवोदित मतदार, दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधिक स्वरूपाते प्रमाणपत्रे देण्यात आले. उल्लेखनीय काम करणाºया अधिकारी व कर्मचारी यांनाही यावेळी गौरविले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर, उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी, उपेंद्र तामोरे, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील, उपस्थित होते. अभिनेता अभिजित खांडकेकर याने सांगितले की, मी आवर्जून मतदान करणार आहे आणि तुम्हीसुद्धा मतदान केलेच पाहिजे. इशा केसकर हिनेदेखील तुम्ही आता बच्चा नसून सुजाण नागरिक आहात. ज्यावेळी तुम्ही मतदानाचा अधिकार राबवाल त्याचवेळी एखाद्या सरकारी यंत्रणेविरोधात आवाज उठवण्याचा हक्क आहे, अन्यथा नाही. आपण मतदान करणार असून कितीही व्यस्त असलो तरी हे कर्तव्य बजावणारच आहे असे सांगितले.सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण, मुरबाडमध्येयंदाच्या मतदार दिनाचे घोषवाक्य ‘ नो व्होटर्स, टू बी लेफ्ट बिहार्इंड’ असे असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून मतदान करावे असा उद्देश आहे ,असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदार नोंदणीमध्ये सर्वाधिक ४० हजार २२९ कल्याण ग्रामीणमध्ये, तर मुरबाडमध्ये ३७ हजार १६७ नावे नोंदविण्यात आली. ऐरोली २० हजार १६२, मुंब्रा कळवा १८ हजार ५९७, मीरा भार्इंदर २२ हजार ७१४ , भिवंडी ग्रामीण १८ हजार ६९५, शहापूर १३ हजार २०१, भिवंडी पश्चिम १९ हजार ४११, भिवंडी पूर्व १४ हजार ९५०, कल्याण पश्चिम ३३ हजार ९६७, अंबरनाथ १७ हजार १३२, उल्हासनगर १० हजार १३०, कल्याण पूर्व १७ हजार १९९, डोंबिवली १० हजार ७०३, ओवळा माजिवडा २१ हजार ३०३, कोपरी ७ हजार ७६३ अशी १८ मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीची आकडेवारी आहे.