कर्जत : शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत रस्त्याची कामे करण्यात आली असताना त्या रस्त्यांची साईडपट्टी कोणत्याही परिस्थितीत खोदून त्यात रिलायन्सची फोरजी केबल टाकू देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश लाड यांनी दिला आहे. याच केबल टाकण्यास आमदार सुरेश लाड अनेक महिने विरोध करीत असल्याने मुंबईमधील आमदार निवासाच्या नंबरवर धमक्या आल्या आहेत. मात्र रस्त्याची साईडपट्टी खोदून टाकलेली केबल उखडून टाकण्याचे काम आम्ही ७ जून रोजी करू, असा इशारा आमदार लाड यांनी कर्जत येथे पत्रकार परिषदेत दिला.कर्जत, खालापूर तालुक्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच आदिवासी प्रकल्प यांच्या माध्यमातून रस्ते उभारणीचे काम करण्यात आले आहे. मात्र त्या रस्त्यांच्या मातीचा भराव केलेल्या साईडपट्टी खोदून रिलायन्सची फोरजी केबल टाकली जात आहे. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी रस्ता खोदून केबल टाकण्याची केली जाणारी कामे थांबविली होती. आमदार लाड यांच्या सूचनेनंतर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. मात्र त्याला न जुमानता केबल टाकली जात असल्याने आमदार लाड यांनी मुख्यमंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र देऊन नियमानुसार केबल टाकण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी केली होती. विरोध कायम ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे धमकावण्यात आल्याचे आमदार लाड यांनी कर्जत येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (वार्ताहर)>ठेकेदार संतप्तजिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आ. लाड यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे संतापलेल्या ठेकेदारांनी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न के ला. मात्र आमदार लाड यांनी न ऐकल्याने आमदार सुरेश लाड यांना आमदार निवासाच्या नंबरवर फोन करून धमक्या देण्यात आल्या.
आमदारांना धमकीचे फोन
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST