मुंबई : पालिका निवडणुकीत प्रचार करू नये म्हणून दिल्लीतील खासदार आणि सिने अभिनेते मनोज तिवारी यांना गुरुवारी त्यांच्या गाडीच्या आरसा तोडून धमकीचे पत्र देण्यात आले. ‘मनोज तिवारी मुंबई में प्रचार बंद करो वरना अभी शिशा तोडा है, आगे तुम्हारा मुह तोड देंगे.’ अशा आशयाच्या मजकुराचा त्यात समावेश आहे. ही बाब समजताच तिवारी यांनी गुरुवारी ट्विट करून याबाबत खंत व्यक्त केली. राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पेव फुटले. त्यांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल झाली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
खासदार मनोज तिवारी यांना धमकीचे पत्र
By admin | Updated: February 17, 2017 03:19 IST