शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांना धमकी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:30 IST

शरद पवार यांना 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तुमचाही दाभोळकर होणार अशा आशयाची धमकी पवारांना देण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. शरद पवारांपाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली. आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला उच्च परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्यांना धमक्या देणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणे हे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कायद्याप्रमाणे निश्चित कारवाई करतील. या प्रकरणावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शरद पवार यांना 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार' अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आला. 

या प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरुन पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तात्काळ या व्यक्तींना अटक करावी अशी मागणीही केली आहे. गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेष बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण एडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या कॉमेंट वाचल्या एवढा द्वेष कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत