शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

इंग्रजी माध्यमाचे हजारो विद्यार्थी झेडपीच्या शाळेत

By admin | Updated: May 3, 2017 11:18 IST

शैक्षणिक उपक्रम : जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे एक पाऊल पुढे

ऑनलाइन लोकमत/रामदास शिंदे पेठ (नाशिक), दि. 3 -  सध्या इंग्रजी माध्यमाचे फॅड पालकांच्या डोक्यात चांगलेच बसले आहे.पण अनेक पालकांना आपल्या पाल्याची इंग्रजी माध्यमातील प्रगती लक्षात येते तेव्हा मुलांना मराठी शाळेमध्ये परत घालण्याशिवाय पर्याय नसतो. या शैक्षणिक वर्षात राज्यभरातून १४ हजार विद्यार्थ्यांनी मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मराठी शाळांच्या वर्ष भरातील राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमांनी ह्याही वर्षी हेच चित्र रहाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

इंग्रजी माध्यमातुन मराठी माध्यमात मुलांनी प्रवेश घेतल्याचे चित्र विशेषत: ग्रामीण भागात अधिक आहे.यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या अनेक उपक्र मांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे शैक्षणकि रूप पालटत असल्याने गावकर्यांनाही या शाळा आपल्या वाटू लागल्या आहेत.त्यामुळे पट वाढीबरोबरच बरोबर इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे समाजातील सर्वच घटकांत आकर्षण आहे.आपला मुलगा इंग्रजी शिकावा,इंग्रजी बोलावा अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते.पण इंग्रजी शाळेत मुलांना घालताना घरातील वातावरणही तसे असावे लागते, हे सुरवातीला पालकांच्या लक्षात येत नाही.त्यामुळे अशी मुलं मागे पडतात.अनेक मुलांना इंग्रजी येत नाही आणि मराठी जमत नाही अशी स्थिती होते.तेव्हा पालक आपल्या मुलाला मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील पालक जिल्हा परिषदेच्या बदलेल्या शैक्षणकि स्वरूपाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी वर्षांपासून विविध उपक्र म राबवत आहे.त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यावर झाला आहे.अनेक शाळांच्या उपक्र माची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आणि त्यातील काही उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले. यावर्षी तंबाखूमुक्त, आयएसओ, शाळासिद्धी,डिजीटल, ई लर्निंग,उपक्र मशील शाळा हे उपक्रम शाळावर सुरू होते.अनेक शाळांनी यात कृतीशील सहभाग घेतला. शालेय वातावरण प्रेरणादायीचालू वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय गणवेश,ई-लिर्नंग सुविधा,रचनावादी शाळा, समाजाचा प्रत्यक्ष सहभाग,शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे शालेय वातावरण प्रेरणादायी ठरत आहे.त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमातील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळू लागली आहेत.ििडजटल शाळांमध्ये ई-लिर्नंगच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. त्यामुळे या शाळांची गुणवत्ता वाढल्याने शाळांविषयी सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. सकारात्मक परिणामजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या उपक्रमांचा चांगला परिणाम दिसत आहे.त्यामुळे गुणवत्तेत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. शिवाय प्राथमिक शिक्षकांनी विविध माध्यमातून समाज सहभाग मिळवत लाखो रुपयाच्या सुधारणा करु न घेतल्याने इंग्रजी शाळांनाही मागे टाकतील, अशा प्रकारच्या शाळा सज्ज झाल्या आहेत. -प्रमोद चिंचोले, शिक्षण विस्ताराधिकारी नाशिक