शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

संकटकाळात मदतीचे हात हजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:38 IST

कोरोनामुळे एकीकडे उद्योग, व्यवसायावर गंडांतर आले आहे तर दुसरीकडे रुग्णांची परवड होत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर मिळत नसल्याची स्थिती तर कुठे बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. मात्र या संकटकाळात मदतीचे हातही पुढे आले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी उपचार व सेवाकार्यास हातभार लावला आहे. 

१५०० डब्यांचे रोज मोफत वाटपअनेक सामाजिक संस्थांनी काेविड सेंटर उभारणीपासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. जेवण तयार करण्यापासून ते रुग्णालयात पोहोचविण्यापर्यंतचे सर्व काम या संस्थाच करीत आहेत. लंगरने भागविली भूक n घरघर लंगर, टीम ५७, सिंधी, पंजाबी, शीख सामाजिक संस्था यासारख्या अनेक संस्था रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण पुरवित आहेत. घरघर लंगरकडून पाच रुग्णालयांत मागेल त्याला पॅक बंद जेवण दिले जात आहे. n आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ५७ जेवण पुरविण्याचे काम करीत आहे. n सिंधी, पंजाबी- शीख सामाजिक संस्थेकडून जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रोज ७०० हून अधिक जणांना डबे पुरवितात. 

लोकप्रतिनिधींचाही मदतीचा हात...केदारेश्वर साखर कारखाना (पाथर्डी), विविध सामाजिक संस्था (अकोले), आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (कोपरगाव), साईबाबा संस्थान (शिर्डी) माजी आमदार चंद्रशेखर घुले (शेवगाव), शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट, नगर शहरात अनाप प्रेम, रोटरी क्लब आदी संघटनांनी कोविड सेंटर उभारले आहे.माणुसकीचे दर्शनजळगावातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अनेकांना आधार मिळत आहे. सेवारथ परिवारतर्फे ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यासह लोकसंघर्ष माेर्चाने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिले असून जनमत प्रतिष्ठान गरजूंचे उदरभरण करीत आहे. सेवारथ परिवाराचे प्रमुख दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी मदत करण्यात पुढाकार घेतला आहे. तसेच रोटरी क्लब, रोटरी क्लब मिडटाऊन, रोटरी क्लब वेस्ट, रोटरी क्लब सेंट्रल, श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार मंडळ व अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले.

लोकसहभागाचा पॅटर्नकट अवस्थेत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी रुग्णालयांची व्यवस्थाही अपुरी पडत आहे, त्यामुळे विविध सेवाभावी संस्था तसेच लाेकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला असून, नाशिक महापालिकेच्या मदतीने विविध खासगी कोविड केअर सेंटर्स उभारले आहेत. विशेष म्हणजे अनेक कोविड सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड‌्सदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लोकसहभागातून कोरोना उपचाराचा नवा पॅटर्न यामुळे उदयास आला आहे. n अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन भुजबळ नॉलेज सिटी तसेच महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने पंचवटीतील विभागीय क्रीडासंकुलात अद्ययावत ३९५ खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. n विशेष म्हणजे यात १८० ऑक्सिजन बेड‌्सदेखील आहेत. याशिवाय वाचनालय, बुद्धिबळ आणि कॅरमसारख्या खेळांची साधनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. n महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि गटनेते विलास शिंदे, भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी लोकसहभागातून कोविड सेंटर उभारले आहे. n तीन कोविड सेंटर मिळून तीनशे बेड उपलब्ध झाले आहेत, तर जैन समाजाच्या जितो या संस्थेच्या वतीने एका तारांकित हॉटेलमध्ये ३५ खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

शिवदुर्ग प्रतिष्ठानचे मदतकार्यप्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानने मदत केंद्र सुरू करून यंत्रणेला मोठा आधार दिला आहे. भाडणे येथील कोविड केअर सेंटर येथे शिवदुर्ग प्रतिष्ठानतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. प्रतिष्ठानचे स्वयंसेवक स्वत:ची काळजी घेत कोविड सेंटरमध्ये शक्य ती सर्व प्रकारची कामे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिक येथे कार्यरत असलेले कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनोहर शिंदे यांनीही प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा दिवस येथे मोफत वैद्यकीय सेवा दिली. डॉ. अनिल नांद्रे व इतर काही डॉक्टरही सेवा देत आहेत. वैद्यकीय सेवेसोबत औषधांची मदतही केली जात आहे.

लोकसंघर्ष मोर्चा कोविड सेंटरn लोकसंघर्ष मोर्चाने नि:शुल्क कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी ४७१ रुग्ण दाखल झाले. त्या पैकी २९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णवाहिकेची तत्काळ उपलब्धता हे या सेंटरचे वैशिष्ट्य ठरत आहे. n चहा, नाश्ता, जेवण दिले जाते. मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस