शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग पदाचा अनुशेष हजारोंनी ' शेष ' : साडेसहा हजार पदे रिक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 11:59 IST

सरकारी, निमसरकारी जागांमधील पदभरतीच्या जागा राज्यात रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देचार टक्के प्रमाणे जागा निश्चित करण्याचे आव्हानदिव्यांग पदांच्या अनुशेषाचा ताळेबंद राज्य सरकारला मांडावा लागणार

- विशाल शिर्के पुणे : सरकारी, निमसरकारी जागांमधील पदभरतीच्या तब्बल साडेसहा हजार जागा राज्यात रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने पदभरतीत दिव्यांगांना तीन वरुन चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने दिव्यांग पदांच्या अनुशेषाचा ताळेबंद राज्य सरकारला मांडावा लागणार आहे. या रिक्तपदांमधे तब्बल साडेचार हजार जागा या ग्रामविकास आणि नगर विकास खात्यातील आहेत. केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने २९ मे रोजी मंजुरी दिली. अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग, शरीरिक वाढ खुंटणे अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (समान संधी संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार अ ते ड श्रेणीतील पदांमधे ३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय २ मे १९९८ रोजी घेण्यात आला होता. राज्यात तीन टक्के नुसारच रिक्त पदांचा अनुशेष भरणे राज्य सरकारला अजून शक्य झालेले नाही. अपंग कल्याण आयुक्तालयाने घेतलेल्या आढाव्यानुसार राज्यात १ जानेवारी २०१७ अखेरीस १७ हजार ९१९ पैकी ११ हजार ४३३ पदे भरण्यात आली असून, तब्बल ६,४८६ दिव्यांग व्यक्तींची पदे रिक्त आहेत. या पदांपैकी अंध व क्षीण दृष्टीची २,८७५, कर्णबधीर २,६२४ आणि अस्थिव्यंगांची ९८७ पदे रिक्त आहेत. या शिवाय पदोन्नतीतील १४३८ जागांचा कोटा देखील भरला गेलेला नाही. ही आकडेवारी दोन वर्षे जुनी आहेत. त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ४ टक्के नुसार पदभरती करण्यात येणार असल्याने, साहजिकच पदांची संख्या देखील वाढणार आहे. त्यामुळे रिक्त जागांचा फेर आढावा घेऊन, बिंदूनामावलीप्रमाणे नवीन अनुशेषाचा आकडा काढावा लागेल. त्यानुसार पदभरती प्रक्रिया मार्गी लावण्याचे मोठे आव्हान अपंग कल्याण आयुक्तालयावर असेल.  

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगGovernmentसरकारjobनोकरी