शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

मालवणमध्ये श्री देव रामेश्वर-नारायणाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल, पालखी सोहळ्याचा उत्साह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 21:24 IST

शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा हजारो मालवणवासीय भाविकांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणात पार पडला.

मालवण - शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा हजारो मालवणवासीय भाविकांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणात पार पडला. मालवण शहर तसेच जिल्ह्यातील हजारो भाविकांच्या गर्दीने मालवण बाजारपेठ फुलून गेली होती. मालवणच्या अभूतपूर्व चैतन्यदायी पालखी सोहळ्याने दिवाळी पाडव्यादिवशी ग्रामदेवतांच्या पालखीचे दर्शन घेऊन ‘मालवण’कर धन्य झाले. 

पालखी सोहळ्याच्या निमित्ताने किनारपट्टीवर स्वच्छतेचे संदेश देणारे आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. तर मच्छिमार बांधवांनी मासेमारी होड्यांची सजावट करून पालखीचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, मालवणवासीयांकडून ठिकठिकाणी करण्यात येणारे पालखीचे भव्य स्वागत, विद्युत रोषणाई व ग्राहकांनी फुलून गेलेली बाजारपेठ आदींनी पाडव्याचा पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला. नोटाबंदी व जीएसटीचा प्रभाव बाजारपेठेत जाणवत असला तरी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेतील दुकानात ग्राहकांची गर्दी होती. मालवणातील ऐतिहासिक श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी सोहळ्यास शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरुवात झाली. गावकर, मानकºयांनी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेवून गाºहाणे घातल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडली. देवतांच्या स्वागतासाठी भक्तजनांकडून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शिवकालीन पालखी आडवण येथील श्री देवी सातेरीची भेट घेऊन पुढे वायरी येथे भूतनाथ देवालयामध्ये रामेश्वर नारायण देवतांची पालखी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे-गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात आले. भूतनाथ मंदिर येथे गा-हाणे, देवतांचे दर्शन व देवभेटीचा सोहळा पार पडल्यानंतर देवतांची पालखी समुद्रीमार्गे मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर येथे आली. दांडेश्वर मंदिर, श्री देवी काळबाई मंदिर, जोशी मांड येथे बहीण-भावांची भेट घेत पालखी बाजारपेठ रामेश्वर मांड येथे ८ वाजता दाखल झाली. 

व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नाना पारकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर,  माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, पूजा करलकर, ममता वराडकर, परशुराम पाटकर, बाळू तारी, बाळू अंधारी, रवी तळाशीलकर, मुकेश बावकर, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, उदय मोरे, दादा कांदळकर, उमेश बांदेकर, आबा हडकर, शेखर गाड, सदा चुरी, दिलीप वायंगणकर, राजू बिडये, सन्मेष परब, रुपेश प्रभू आदी भक्तांनी दर्शन घेतले.  ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होण्यासाठी व श्री देव रामेश्वर-नारायण पालखीचे दर्शन घेण्यासाठी समस्त मालवणवासीय आतुरलेले होते. ठिकठिकाणी जंगी स्वागत झालेली पालखी बाजारपेठ येथील रामेश्वर मांड येथे दर्शनासाठी थांबताच भाविकांची गर्दी झाली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेण्यात आले. रात्री १० वाजल्यानंतर पालखी बाजारपेठ, भरड, देऊळवाडा मार्गे पुन्हा मंदिरात मार्गस्थ करण्यात आली. 

रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओढा कमी झाला नव्हता. एसटीच्या संपामुळे गेले चार दिवस बाजारपेठेवर परिणाम जाणवला होता, मात्र पालखी सोहळ्यात एसटी संपाची झळ बसली नाही.  पोलीस प्रशासनाकडून नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजारपेठेत बच्चे कंपनी वाळूचे किल्ले बनवून आपला आनंद द्विगुणीत करत होते. वीज वितरणच्या कर्मचारी वर्गानेही अखंडित आपली सेवा बजावली.