शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याला अडीच हजार कोटी अन् पूरग्रस्तांना १५४ कोटींची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 18:07 IST

पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहत आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारणीसाठीचे पॅकेज वाढवावे ही माफक इच्छा पीडितांची आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर अनेक अंशी राजकारणाच्या व्याख्या बदलल्या आहेत. या बदलांकडे सकारात्मकतेने पाहिल्यास देश आधुनिकतेची कास धरतोय, असंच दिसत. जटील समस्यांवर निर्णय घेतले जात आहेत. ही नव्या भारताची नांदीच म्हणावी लागले. परंतु, अजुनही काही बाबींवर काम होणे गरजेचे आहे. महापुरातील विस्थापितांसाठी जाहीर झालेले पॅकेज आणि नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये खर्च करण्यात आलेल्या रक्कमेत मोठा दुजाभाव दिसून येतो. हा दुजाभाव संपुष्टात आणण्याची आज गरज आहे.

गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला. या महापुरामुळे हजारो लोकांचे संसार देशोधडीला लागले. अनेकांच्या संसाराचा गाडा पाच ते दहा वर्षांनी मागे गेला. या परिस्थितीत पिडीतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. मात्र या आपत्तीत प्रशासन आणि सरकार काही प्रमाणात मागे राहिलं अशी ओरड होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटात एक वाक्य मनाला शिवून गेलं होतं. ते म्हणजे 'ये नया इंडिया है', पण हे वाक्य चित्रपटापुरतच राहिलं का, अस वाटत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरात अनेकांना जीव गमवावा लागला. तर हजारो लोकांच्या संसाराची वाताहत झाली. पुरग्रस्तांना सरकारकडून १५४ कोटी रुपये मदत जाहीर करण्यात आली. यानुसार कुटुंबाला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. ही मदत फारच तोकडी आहे. याउलट २०१५ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी याच सरकारने सुमारे अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. भक्तीसाठी सरकार अडीच हजार कोटींचा निधी देते, मात्र पुरग्रस्तांचे विस्थापित झालेले संसार उभारण्यासाठी केवळ १५४ कोटी रुपये, नव्या भारतात पूरग्रस्तांसोबत असा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित होतो.

पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहात आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारणीसाठीचे पॅकेज वाढवावे हिच माफक इच्छा महापूर पीडितांची आहे.