शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिला पोलिसास लिंग बदलाची परवानगी नाकारली, पोलीस महासंचालकांचे बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 22:45 IST

बीड जिल्हा पोलीस दलातील एका २७ वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदलाची परवानगी मागितल्याने राज्यात खळबळ उडाली होती. तीन दिवस हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिका-यांपुढे निर्णयास्तव विचाराधीन होते. अखेर...

 बीड - बीड जिल्हा पोलीस दलातील एका २७ वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदलाची परवानगी मागितल्याने राज्यात खळबळ उडाली होती. तीन दिवस हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिका-यांपुढे निर्णयास्तव विचाराधीन होते. अखेर शनिवारी रात्री उशिरा पोलीस महासंचालकांनी बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना लिंगबदलाची परवानगी नाकारल्याचे पत्र पाठविले आहे.क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या पोलीस दलातील महिलेने श्रीधर यांच्याकडे चार दिवसांपूर्वी एका अर्जाद्वारे लिंग बदलण्यासाठी परवानगी मागितली होती. असे प्रकरण पहिल्यांदाच असल्याने श्रीधर यांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला. त्यांच्याकडूनही याबाबत निर्णय न झाल्याने प्रकरण पोलीस महासंचालकांकडे गेले. दोन दिवस विचारविनिमय झाला. शनिवारी रात्री परवानगी नाकारल्याचे पत्र बीड पोलीस अधीक्षकांना महासंचालक यांच्याकडून मिळाले. त्यामुळे आता ही महिला पोलीस कर्मचारी न्यायालयात जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीचा संपर्क होऊ शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सदरील महिला पोलीस मुंबईमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी गेल्याचे सांगण्यात आले. परंतु अधिकृत दुजोरा मिळाला नाही.पुरुष होण्याचे स्वप्न अर्धवटमागील अनेक वर्षांपासून ही महिला पोलीस पुरुषांसारखी राहत होती. तिचे हावभाव, भावनाही पुरुषांसारखे आहेत. तसेच तिला स्वत:लाही आपण स्त्री नसून, पुरुषच असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तिने अधीक्षकांकडे धाव घेऊन लिंग बदल करुन पुरुष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु महासंचालकांनी हा अर्ज फेटाळून लावल्याने तूर्त तरी तिचे पुरुष होण्याची स्वप्न अर्धवटच राहिले.नोकरी नको, लिंग बदल हवापोलीस अधीक्षकांकडे एकवेळ पोलीस नोकरी गेली तरी चालेल, परंतु आपण लिंग बदल करणारच, असे सांगितले होते. त्यामुळे महासंचालकांनी परवानगी नाकारल्यानंतर त्या महिला पोलिसची पुढची भूमिका काय असेल? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलीस महासंचालक यांच्याकडून लिंग बदल अर्जावर विचार होऊन परवानगी नाकारल्याचे पत्र आम्हाला मिळाले आहे.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड.

टॅग्स :Policeपोलिस