शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी सहकार मोडला, त्यांना मोडून काढू - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:35 IST

राज्य सरकार सहकार क्षेत्राच्या विरोधात नसून पाठीशी आहे. याआधी ज्यांनी सहकार मोडला, त्यांना मोडून काढू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

मुंबई : राज्य सरकार सहकार क्षेत्राच्या विरोधात नसून पाठीशी आहे. याआधी ज्यांनी सहकार मोडला, त्यांना मोडून काढू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबई बँकेने मरिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, सरकार नेहमीच सहकारी संघाच्या पाठीशी असेल. मात्र त्यासाठी संघाने बिझनेस मॉडेल उभारावे, त्याशिवाय ग्रामविकास शक्य नाही. चांगल्या परिस्थितीत असलेल्या सहकारी संस्थांनी अडचणीत असलेल्या संस्थांचे पालकत्व घेतल्यास नक्कीच सहकारी संस्थांचे विस्तीर्ण जाळे पसरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, सहकारी संघाला अनुदान नको असून केवळ पूर्वी सुरू असलेला शिक्षणनिधी पुन्हा सुरू करावा. अनेक संस्थांच्या शैक्षणिक निधीमधून कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकतो. मात्र त्यासाठी केवळ कायद्यात थोडासा बदल करावा लागेल. या वेळी १४ शिखर संस्थांच्या मागण्यांचे निवेदनही दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. लवकरच १४ शिखर संस्थांसोबत सविस्तर बैठक घेऊन व कायद्याचा अभ्यास करून मागील सरकारने बंद शिक्षणनिधी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सहकारी संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास तिडके, महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष व मुंबई बँकेचे संचालक प्रसाद लाड आदी उपस्थित होते.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सहकारी संस्थांना अनुदानाच्या कुबड्या काढून सक्षम होण्याचा सल्ला दिला. देशमुख म्हणाले की, सहकारी संस्थांनी गुणवत्ता सुधारावी. सरकारविरोधात सहकार मोडीत काढण्याचा आरोप होत आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत एकही सहकारी संस्था बुडवण्याचा प्रयत्न सरकारने केलेला नाही. आधीपासूनच २२ हजार सहकारी संस्थांतील ११००० संस्था बंद आहेत. त्यातील ५००० संस्थांना पुनर्जीवित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस