शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"हे बहुमत खरे मत नाही, ही सर्व लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता" हिटलरचं नाव घेत ठाकरेंचा भाजपवर निषाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 20:16 IST

"हे बहुमत खरे मत नाही. हे सर्व लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे," असे म्हणत आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते मुलूंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलत होते.

माझे आजोबा म्हणायचे, दगडाला शेंदूर लावला तर तो देव, नाही तर धोंडा आहे. आम्ही धोंडा आहोतच. जो कुणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा कपाळमोक्ष करण्याची ताकद आमच्या या सर्व मराठी मनामध्ये आहे. आपण दगड बणून या सर्वांना सामोरे जायला हवे. म्हणजे त्या सर्वांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अत्ताच संजय राऊत तुम्ही जे सांगितलंत, जसा पुतीन जिंकला, हिटलरसुद्धा जिंकला होता. हो हिटलरला सुद्धा ९० टक्के ९५ टक्के ९७ टक्के मते मळाली होती.  पुतिनला सुद्धा आताच्या काळात बहुमत मिळाले आहे. तसेच यांनाही बहुमत मिळत आहे. हे बहुमत खरे मत नाही. हे सर्व लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे. असे म्हणत आज रवीवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते मुलूंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलत होते.

"ही थेर मला बाळासाहेबांनी शिकवलेली नाहीत" -ठाकरे पुढे म्हणाले, "मी तुम्हाला संबोधित करताना, 'हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातानो' म्हणाले, पण इकडे काही मुस्लीम असतील, ख्रिश्चन असतील, ते आपल्यासोबत आले, त्यांना आपले हिंदुत्व मान्य आहे, कारण आपले हुंदुत्व देशप्रेमाशी निगडित आहे. ते ज्यांना मान्य आहे, मग तो मुस्लीम असला तरी तो आमचा आहे. मी जाहीर सांगतो. माझे हिंदूत्व यांच्यासारखे नाही, इकडे पाकिस्तानचा निषेध करायचा आणि तिकडे दुबईमध्ये जाऊन पाकिस्तानी माणसासोबत हिंदुस्तान- पाकिस्तान सामना बघायचा. ही थेर मला बाळासाहेबांनी शिकवलेली नाहीत."

...तर भाजपच्या पोटात का दुखावं? -"इकडे ५६ इंचांची छातीही फेक नरेटिव्ह आणि तिकडे जाऊन नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा. आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लीम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? असा सवालही यावेळी उद्ध्व ठाकरे यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे