शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 09:37 IST

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत अवघड प्रश्नांना दिलखुलास उत्तरे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर बारामतीची लढाई ही दोन वेगळ्या राजकीय विचारांची लढाई झाली आहे. पत्नी म्हणून मी त्यांची साथ देणे, हे माझे कर्तव्य होते. त्यातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपण होकार दिला. आता जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’च्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा पवार यांनी अनेक बाबींचा खुलासा केला. 

राजकारणात येऊन निवडणूक लढवावी लागेल, हा विचार आधी कधी केला नव्हता; पण कटू प्रसंगाने हे घडलेले आहे. अजित पवारांची पत्नी तर आहेच; पण आता उमेदवार म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

‘विकासाच्या मुद्द्यावरच लढत’ अजित पवार हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. अनेक संधी त्यांच्याकडे आलेल्या होत्या. कदाचित त्यांना अजून चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या; पण त्या करता आल्या नाहीत. म्हणूनच अजित पवार यांनी विचारपूर्वक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अजित पवार यांचे राजकारण मर्यादित झालेले नाही, असे सांगून सुनेत्रा पवार यांनी आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गरजा आहेत. काही ठिकाणी एमआयडीसी, पुरंदरचे विमानतळ, पाणीटंचाई तसेच रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहील, असे त्या म्हणाल्या.राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीला स्थानिक नेत्यांमध्ये संदिग्धता होती. पण उमेदवारी मिळाल्यानंतर स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्या मनातला संभ्रम दूर झाला. सर्वजण एकदिलाने कामाला लागले. महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, नेते हे सोबत होते. एकप्रकारे अजित पवारांनी केलेला बारामतीचा विकास, इतर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात आहे.

पवार कुटुंबियांमध्ये ही नात्यांची लढाई नसून, वैचारिक राजकीय लढाई असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, तेव्हा बारामतीचा खासदार आपलाच पाहिजे, याचा अजित पवारांनी निश्चय केलाय. त्यामुळे ही वैचारिक लढाई असून, सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत इथे होते आहे. पण नात्यात भावनिक राजकारण आणले गेले. त्याचा सहानुभूतीसाठी वापर झाला. पण बारामती मतदारसंघात महायुतीचे चार आमदार आहेत, तिथे चांगल्या प्रकारे मतदान आपल्याला होईल. जिथे आमदार नाहीत, तिथेही मते मिळतील असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.

‘नात्यात राजकारण आणणे चुकीचे’  अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता नात्यात राजकारण आणणे चुकीचे आहे. राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी ठेवले तरच चांगले. पवार कुटुंब विभागल्यानंतर अजित पवारांनी मला दिल्लीतले राजकारण सांभाळण्यास लोकसभेच्या रिंगणात उतरवलेले आहे. अजित पवारांनी बारामती तालुक्याचा विकास केला, तसा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही, असा दावा सुनेत्रा पवार यांनी केला.  

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४