शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वारीच्या मार्गावरील ३० हजार शौचालय ताब्यात : बबनराव लोणीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 11:55 IST

वारीमध्ये स्वच्छता राहावी आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे.

ठळक मुद्दे३०० किर्तनकारांच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी करणार जनजागृती पालखी सोहळ्यात अनुक्रमे ९०० आणि ७०० असे एकूण १६०० फिरती शौचालय पर्यावरण रक्षणासाठी वारी मार्गावर वृक्षलागवड करण्यासाठीही उपक्रम सुरू

पुणे : श्री क्षेत्र, देहू, आळंदी ते पंढरपूरपर्यंत वारीच्या मार्गावर ३० हजार शौचालय आपण ताब्यात घेतली आहेत. तसेच निर्मल वारी अभियानातून १६०० फिरत्या शौचालय उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे स्वच्छता, आरोग्याचा कोणताही प्रश्न पालखीत निर्माण होणार नाही. तसेच संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्या ३०० किर्तनकारांच्या माध्यमातून स्चछतेसाठी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे उपस्थित होते.लोणीकर म्हणाले, वारी मार्गातील प्रत्येक गावागावातील खासगी व शासकीय अशी ३० हजार शौचालये, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अनुक्रमे ९०० आणि ७०० असे एकूण १६०० फिरती शौचालय देण्यात आली आहेत. त्यामुळे महिला-पुरूष वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य आणि पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग यासाठी प्रत्यक्ष नियोजन करून काम करत आहे. त्याचबरोब विविध कंपन्यांच्या (सीएसआर) फंडातून अनेक गावांत शौचालय देण्यात येत आहेत. त्याचा फायदा वारकऱ्यांना होणार आहे. वारीमध्ये स्वच्छता राहावी आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी अनेक जिल्ह्यातील प्रचार रथ यासाठी काम करत आहेत. स्वच्छतेचे महत्त्व, रोगराईबाबत जनजागृती भारूड, किर्तनातून करण्यात येत आहे. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी देखील जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी वारी मार्गावर वृक्षलागवड करण्यासाठीही उपक्रम सुरू आहे.............घरा-घरांत शौचालय उभारणीचे काम पूर्णराज्यातील ३ कोटी नागरिक पूर्वी रस्त्यावर शौचालयासाठी जात होते. तसेच ७० लाख लोकांच्या घरी शौचालयाची व्यवस्था नव्हती. मात्र मागील ४ वर्षांत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळे आज प्रत्येकाच्या घरात ही सुविधा पोहोचल्या आहेत. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटायला लागले आहे, असे बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेBabanrao Looneykarबबनराव लोणीकरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPandharpur Wariपंढरपूर वारी