शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

कर्जमाफीसाठी ठाण्यातून ३० हजार अर्ज दाखल, कर्जमाफीचे फॉर्म तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासन शेतक-यांना कर्जमाफी करत आहे. यासाठी सुमारे ६६ कॉलममध्ये शेतक-यांना माहिती भरावी लागत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासन शेतक-यांना कर्जमाफी करत आहे. यासाठी सुमारे ६६ कॉलममध्ये शेतक-यांना माहिती भरावी लागत आहे. जिल्हा बँकांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार २१५ शेतकºयांची ६६ कॉलममध्ये मॅन्युअली माहिती भरून घेतली. याशिवाय, १५ हजार ५९८ फॉर्मही शेतकºयांना आॅनलाइन अपलोड करून दिल्याचा दावा केला आहे.शासनाने ठिकठिकाणी ई-महासेवा केंद्रे सुरू केली आहेत. त्या ठिकाणी कर्जमाफीचे फॉर्म विनामूल्य शेतकºयांना स्वत: अपलोड करणे अपेक्षित होते. मात्र, ते शक्य झाले नसते. शेतकºयांची ही समस्या दूर करण्यासाठी टीडीसीसी बँकेने सुमारे ५९ शाखांमध्ये आॅनलाइन मोफत सेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी बँकेचे सुमारे ५५८ कर्मचारी मनुष्यबळ कार्यरत ठेवले आहे. राज्यात केवळ आमच्याच बँकेने ही सेवा शेतकºयांना उपलब्ध करून दिल्याचा दावा टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे यांनी केला.कर्जमाफीचे अर्ज शुक्रवारपर्यंत भरून घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३० हजार २१५ शेतकºयांचे फॉर्म भरून घेतले आहेत. पण, आता २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ शासनाने दिली आहे. पण, आधीच जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे फार्म भरून घेण्यासह अपलोडही केले. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी सुमारे २०७ शेती संस्थांशी संलग्न आहेत. त्यातील १४ हजार ७११ शेतकºयांचे अर्ज भरून घेतले आहेत. त्यातील सात हजार ९८७ शेतकºयांचे अर्ज आॅनलाइन अपलोड केले आहेत.शेतकºयांचे कर्जमाफीचे फॉर्म तालुकास्तरीय लेखा अधिकाºयांकडून तपासणी करूनच अपलोड होत आहे. अपलोड झालेले कर्जमाफीचे अर्ज तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार तपासणार आहेत.यानंतर, हा संपूर्ण डाटा पुन्हा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासला जाणार आहे. यानंतर, हा संपूर्ण डाटा विभागीय आयुक्तांद्वारे शासनाकडे कर्जमाफीच्या लाभासाठी जाणार आहे.