शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 07:17 IST

राज्यातील तज्ज्ञांच्या मतांवर आक्षेप. डॉ. शशांक जोशी म्हणाले होते की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हे विधान केले होते. त्यावर राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीच्या कार्यगटातील (एनटीएजीआय) सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 

डॉ. शशांक जोशी म्हणाले होते की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते. महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. अशा वेळी लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणारे वक्तव्य डॉ. जोशी यांनी केले आहे, असा आक्षेप एनटीएजीआयमधील तज्ज्ञांनी घेतला.  एनटीएजीआयचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अशा वक्तव्यांची केंद्र सरकार योग्य दखल घेईल, असे ते म्हणाले. 

शास्त्रीय निरीक्षणाची जोड नाहीएनटीएजीआयने म्हटले आहे की, महाराष्ट्रात येत्या दोन ते चार आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, या वक्तव्याला कोणत्याही शास्त्रीय निरीक्षणाची जोड नाही. देशातील ५० ते ६० टक्के जनतेला सामूहिक प्रतिकारशक्तीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत तरी तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. याआधी केलेल्या सिरो सर्वेक्षणांतही ही बाब स्पष्ट झाली आहे. 

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका नाही : एम्सn सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारांमुळे या साथीच्या तिसऱ्या  लाटेत २ वर्षे किंवा त्यापुढील वयाच्या मुलांवर विपरित परिणाम होणार नाही, असे एम्सने केलेल्या नव्या पाहणीच्या निष्कर्षांत म्हटले आहे. n या पाहणीसाठी १५ मार्च ते १० जून या कालावधीत कोरोना विषाणू व रुग्णांविषयी दिल्ली, भुवनेश्वर, आगरतळा आदी ठिकाणांहून माहिती गोळा करण्यात आली होती.

३०% लोकांना लसीचा किमान एक डोस जरी मिळाला असेल तर कोरोनाची आणखी लाट लगेचच येण्याची शक्यता उरत नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक