शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांची लुटमार

By admin | Updated: June 11, 2014 01:43 IST

त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच हल्लाबोल केला. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी ए-१, बी-१, एस-४, एस-९ या कोचमध्ये अक्षरश: लूट माजवली.

३५ प्रवाशांचा १ कोटींचा मुद्देमाल पळविला : नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा गोंधळनागपूर : त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच हल्लाबोल केला. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी ए-१, बी-१, एस-४, एस-९ या कोचमध्ये अक्षरश: लूट माजवली. यात ३० ते ३५ प्रवाशांचे दागिने, महागडे साहित्य, कपडे अशा एकूण १ कोटी रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. सकाळी विजयवाडा रेल्वेस्थानकावर प्रवासी झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना साहित्य चोरीला गेल्याचे कळताच त्यांच्यात खळबळ उडाली. त्यामुळे ही गाडी नागपुरात तब्बल दीड तास उशिराने पोहोचली. प्रवाशांनी गोंधळ घालू नये यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यात कुठलातरी स्प्रे मारून चोरट्यांनी ही लुटमार केल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस ही गाडी रात्री ११.१५ वाजता मद्रास रेल्वेस्थानकावरून सुटली. मद्रासवरून गाडी सुटताना सर्व प्रवाशांचे साहित्य जशास तसे होते. यात ए-१, बी-१ या कोचमध्ये ३० ते ४० वेटिंगवर असलेले प्रवासी बसून होते. शंका आल्यामुळे काही प्रवाशांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. परंतु गाडीतील टीटीईने तुम्हाला काय करायचे अशी प्रवाशांची दमदाटी केली. थोड्या वेळाने सर्व प्रवासी झोपी गेले. त्यानंतर रात्रभर चोरट्यांनी आपल्या कारवाया सुरू ठेवून ३५ ते ४० प्रवाशांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, महागडे मोबाईल असा एकूण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी ६ वाजता त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस विजयवाडा रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना आपले साहित्य चोरीला गेल्याचे कळताच त्यांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक रेल्वेस्थानकात प्रवाशांनी पोलिसात तक्रार देणे सुरू केले. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ४.४० वाजता येते. परंतु चोरीच्या घटनेमुळे ही गाडी तब्बल दीड तास उशिराने सायंकाळी ६ वाजता प्लॅटफार्म क्रमांक सहावर आली. प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर गोंधळ घालू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त चौधरी, निरीक्षक कल्याण मोरे, आर. एन. सिंग, लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडीतून उतरल्यानंतर संतप्त प्रवाशांनी पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना आपली कैफियत सांगितली. सायंकाळी ६.२० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.प्रवाशांची कैफियतया गाडीच्या ए-१ कोच, बर्थ २७, २८ वरून प्रवास करणारे टेटस टोनी (४०) रा. भिलाई या प्रवाशाने आपले ५ लाखाचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती दिली. एस-९ कोचमधून बर्थ क्रमांक ५०, ५२, वरून प्रवास करणारे रामचंद्र मुदलीयार (५३) रा. कोरबा यांच्या पत्नीचे दोन महागडे सोन्याचे नेकलेस, मंगळसूत्र, कानातले टॉप्स, १.६५ लाख रुपये रोख आणि मुलाच्या शिक्षणासाठी काढलेला १.५५ लाखाचा डिमांड ड्राफ्ट असा एकूण ४ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. बी-१ कोचच्या बर्थ क्रमांक ५८, ५९, ६१, ६७ वरून प्रवास करणारे के. संतोषकुमार यांचेही १.५० लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. बी-१ कोचमधून प्रवास करणारे सीताराम पिल्ले यांचेही सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ७ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. (प्रतिनिधी)