शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करून चोरटे बनले कोट्यधीश..!

By admin | Updated: March 29, 2015 00:21 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जसे शरीराविरुद्धचे गुन्हे वाढत चालले आहेत, तसेच मालमत्तेविरुद्धचेही गुन्हे वाढत चालले आहेत.

लक्ष्मण मोरे ल्ल पुणेपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जसे शरीराविरुद्धचे गुन्हे वाढत चालले आहेत, तसेच मालमत्तेविरुद्धचेही गुन्हे वाढत चालले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मिळून गेल्या वर्षभरात चोरट्यांनी केलेल्या १,३६४ घरफोड्यांमध्ये तब्बल २३ कोटी ६७ लाख ६९ हजार ६५१ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरफोड्या असतानाही त्या उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. पोलीस ठाण्यांचे आणि गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्यांचा छडा लावण्यात अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.एकेकाळी पेठांपुरते मर्यादित असलेल्या शहराच्या कक्षा झपाट्याने रुंदावत चालल्या आहेत. शहराच्या भोवती उपनगरांची संख्या वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या प्रमाणात मात्र पोलिसांचे मनुष्यबळ वाढलेले नाही. तोकड्या आणि अपुऱ्या मनुष्यबळावर पोलिसांना दैनंदिन कामकाजासोबत तपासाचा गाडा ओढावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षित असलेले परिणामही पाहायला मिळत नाहीत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसाला साधारणपणे चार घरफोड्या होत आहेत. तर, महिन्याला साधारणपणे १२० च्या आसपास सरासरी घरफोड्या होत असल्याची आकडेवारी आहे. तर, महिन्याला साधारणपणे १९ लाखांचा ऐवज चोरटे लांबवत आहेत. रात्रीच्या वेळी सर्वाधिक घरफोड्या होत असल्या, तरी अलीकडच्या काळात दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: उपनगरांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण अधिक आहे. यासोबत पुणे शहराच्या मध्यवस्तीतील विश्रामबाग, फरासखाना, खडक आणि डेक्कन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्येही गेल्या काही दिवसांत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी, चिखली, भोसरी, काळेवाडी, निगडी, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रहाटणी आदी भागातही घरफोड्या वाढल्या आहेत. तर, पुण्याच्या भोवतालची वारजे, कोथरूड, हडपसर, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, फुरसुंगी, कोंढवा, मुंढवा, खडकवासला आदी भागांत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांकडून मात्र ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. शेजारीच खरा पहारेकरीघरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही योजना सुरु केली होती. आपल्या शेजारी कोण राहतो, याची माहिती नागरिकांनी ठेवावी. घराबाहेर जाताना, बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे, तसेच घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. आपल्या शेजारी काय चालले आहे, काही संशयास्पद तर नाही ना, याची प्रत्येक शेजाऱ्याने काळजी घेतली, तर या घटना कमी होऊ शकतात. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस पोचू शकत नाहीत.घरफोडीच्या घटनांना रोखण्यात जसे पोलीस अयशस्वी ठरले आहेत, तसेच नागरिकही कमी पडत आहेत. आपल्या घराची सुरक्षा केवळ एका कुलपाच्या आधारे सोडून घरातील सर्व व्यक्ती बाहेर जातात. अनेक घरांना लॅचलॉक नसते. चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा, कुलूप कटावणीच्या साह्याने उचकटून घरातील ऐवज लंपास करतात. तर अनेकदा कटरच्या साह्याने ग्रीलचे दार किंवा खिडक्या तोडून ऐवज लांबवला जातो. पोलिसांनी अनेकदा आवाहन करुनही नागरिक सोसायट्यांमध्ये, घरांभोवती सीसीटीव्ही बसवीत नाहीत. जे बसवतात त्यांचा दर्जा फारच सुमार असतो. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येतात. गुन्हे सन २०१४ सन २०१५दाखल १३६४ २२२उघड ४५३ ३९सरासरी ३३.२१% १७.५६%गेला माल २३,६७,६९,६५१ रु.२,८०,५६,५८९ रु.मिळाला माल २,४६,३७,९४६ रु.३२,९३,२८२ रु.