शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"ते अडीच वर्ष घरात होते..."; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 09:33 IST

निवडणूक ही अटीतटीची असते. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आमची तयारी झाली आहे असं मंत्री संदीपान भुमरे म्हणाले.

औरंगाबाद - ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत आमचा काहीही संबंध नाही. महापालिकेवर आम्ही दबाव आणला नाही. कोर्टानं याबाबत निर्णय दिला आहे. निवडणूक म्हटलं तरी कुणीही उभं राहणारच आहे. एखादं काम झालं नाही तर सरकारने दबाव आणला हेच आरोप होतात. आम्ही आधीपासून मैदानात आहे. ते अडीच वर्ष घरात बसले होते. आमच्यामुळे मैदानात आले. आम्ही आजही मैदानात आहे असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आमची तयारी झाली आहे. निवडणूक ही अटीतटीची असते. यात आमचा विजय होईल. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. बिगर मेहनतीशिवाय जिंकता येत नाही. आम्ही या निवडणुकीत जिंकू. सगळ्या तयारीनिशी आम्ही मैदानात उतरलो आहे. आमची पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे जागा भक्कम करण्यावर आमचा भर आहे असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोर्टात जावं लागतंय. मैदानासाठी कोर्टात जा, उमेदवारीसाठी कोर्टात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या. माझी तर तयारी आहे. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही याची तयारी करण्यापेक्षा एकाच व्यासपीठावर समोरासमोर येऊ आणि होऊन जाऊ देत काय व्हायचं ते" असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. 

वादळ निर्माण करणारे शरद पवारसोबतछगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी फारुक अब्दुल्ला आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "फारुख अब्दुल्ला मला भेटले. त्यांची आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. ते आल्या आल्या मला म्हणाले अजिबात घाबरु नको वडिलांसारखा लढ. अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. त्यावेळी अनेक मोठी वादळं देखील शिवसेनेसोबत होती. आताच्याही वादळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी वादळं सोबत आहेत. वादळ निर्माण करणारे शरद पवार सोबत आहेत. वादळ असो, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे सोबत असताना मी तर लढाईच्याच क्षणाची वाट पाहातोय" असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे