शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

‘त्यांना’ आजही रस्ता, वीज, पाणी नाही!

By admin | Updated: November 3, 2016 01:33 IST

ब्रिटिश राजवटीत काही विमुक्त जाती-जमाती या गुन्हेगार म्हणून ओळखल्या जात होत्या.

कळस : ब्रिटिश राजवटीत काही विमुक्त जाती-जमाती या गुन्हेगार म्हणून ओळखल्या जात होत्या. या कायद्यांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या लोकांना कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. आजही या जाती-जमाती अतिशय मागासलेल्या आहेत. अजूनही त्यांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकास होऊ शकलेला नाही. कडबनवाडी (ता. इंदापूर) येथील गावकुसाबाहेर राहणाऱ्या रामोशी या भटक्या विमुक्त जातीतील नागरिक आजही रस्ता, वीज व पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत.या ठिकाणी खोमणे, भंडलकर, जाधव, चव्हाण, मदने व बोडरे या आडनावांची सुमारे ९० कुटुंबे गेली काही दशके राहत आहेत. काही कुटुंबांकडे असणाऱ्या थोड्याफार कोरडवाहू शेतीवर हा समाज उदरनिर्वाह करतो. मात्र, अनेक कुटुंबांकडे शेती नसल्याने मोलमजुरी करावी लागते. अनेक कुटुंबांकडे राहायला पक्के घर नाही. सुमारे ५०० लोकवस्ती असलेल्या या समाजात उचशिक्षित कोणीही नाही. लढाऊ आणि शूर असलेला हा समाज विकासापासून अद्याप खूप दूर आहे. महाराष्ट्रातून स्वातंत्र्यानंतर जे रामोशी आंध्रात गेले, त्यांचा समावेश आदिवासींमध्ये झाला. कर्नाटकातही वाल्मीकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच रामोशी समाजाला आदिवासींचा दर्जा देण्यात आला, तर महाराष्ट्रात मात्र हा समाज गुन्हेगार जमात म्हणूनच ओळखला जाऊ लागला.रामोशी लोक स्वत:ला रामवंशी म्हणवितात. आॅगस्ट १९५१मध्ये सोलापूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तारेचे कुंपण मोडून इंग्रजांनी गुन्हेगारी ठरवलेल्या या जमातीला मुक्त केले. तेव्हापासून ‘विमुक्त’ म्हणून ओळखली जाऊ लागले. १९६१मध्ये १४ जातींना विमुक्त व २८ भटक्या जाती-जमातींची स्वतंत्र यादी करून आरक्षण दिले. मात्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आदिवासी वर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांना तिकडे सोयीसवलती मिळतात. महाराष्ट्रातला हा समाज मात्र यापासून वंचितच आहे. (वार्ताहर)>मोठी लोकवस्ती आहे. आजही विज, पाणीपुरवठ्याची सोय नाही. शेळगाव-कळस रस्त्यावर वाहतुकीची सोय नाही. येथील समाज मंदिरही अर्धवट अवस्थेत आहे. गावगाड्यात सामावून घेतले जात नाही. इतर समाजाप्रमाणे आम्हाला सुविधा मिळत नाहीत. गारपिटीत आमच्या समाजाची सुमारे ७ घरे पडली होती. मात्र, आजही पाठपुरावा करून दखल घेतली जात नाही. आजही अनेक लोकांना राहायला घरासाठी जागा नाही. गावपातळीवरील राजकारणामुळे वंचित राहावे लागत आहे. - महेश खोमणे,