शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ मांस गोवंशाचे

By admin | Updated: July 15, 2017 22:19 IST

नागपूरसह देशभरात खळबळ उडवून देणा-या भारसिंगी नरखेड येथील कथित गोमांस प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 15 - नागपूरसह देशभरात खळबळ उडवून देणा-या भारसिंगी नरखेड येथील कथित गोमांस प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. शनिवारी पोलिसांना प्रयोगशाळा तज्ज्ञांकडून अहवाल मिळाला. त्यात हे मांस गोवंशाचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, ते गाईचेच आहे, असा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे कथित गोरक्षकांनी केलेल्या दाव्यांवर पाणी फेरले गेले आहे. 
 
सलीम इस्माईल शहा (३२) हा बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एमएच-४०/५६३६ क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने जलालखेड्याहून काटोलला जात असताना भारसिंगी येथे काही तरुणांनी त्याला अडविले. सलीमकडे गोमांस असल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे तरुणांनी त्याच्या वाहनाची डिक्की तपासली. त्यात पिशव्यांमध्ये मांस  आढळून येताच तरुणांनी जलालखेडा पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे सलीमने घटनास्थळाहून पळ काढला.  तरुणांनी पाठलाग करून त्याला  पकडले आणि जबर मारहाण केली. त्यात सलीम  बेशुद्ध झाला होता. पोलिसांनी  घटनास्थळ गाठून सलीमला तसेच त्याचे वाहन व संपूर्ण साहित्य ताब्यात घेतले आणि जलालखेड्याला आणले. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला बुधवारी सायंकाळी नागपुरातील मेयो रुग्णालयात भरती केले. 
 
हे प्रकरण चिघळल्यामुळे सलीमला मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी रात्री पोलिसांनी मोरेश्वर तांदूळकर (३०, रा. भारसिंगी, ता. नरखेड), जगदीश चौधरी (२८, रा. मदना, ता. नरखेड), अश्विन उईके (२६, रा. नारसिंगी, ता. नरखेड) आणि रामेश्वर तायवाडे ( २७, रा. जामगाव, ता. नरखेड) या चौघांना अटक केली. आरोपींची सोमवारपर्यंत (दि. १७)  कोठडीही पोलिसांनी मिळविली आहे. या घटनेने भारसिंगी जलालखेडाच नव्हे तर देशभरात खळबळ उडवली होती. नरखेड तालुक्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस प्रशासनाने भारसिंगी तसेच सलीम राहत असलेल्या काटोल येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.   दुसरीकडे जप्त केलेले मांस विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना पोलिसांना शनिवारी या संबंधाने तज्ज्ञांचा अहवाल मिळाला. त्यात हे मांस गोवंशाचे असल्याचे नमूद आहे. परंतु गाय की बैलाचे ते स्पष्ट नसल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला नाही. 
 
दरम्यान, सलीमला गुरुवारी सकाळी मेयो रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी त्याच्या छातीत वेदना व्हायला सुरुवात झाल्याने त्याला पुन्हा मेयोमध्ये भरती करण्यात आले होते. 
 
पोलीस म्हणतात, शिक्षा सारखीच 
हे मांस बैलाचे असल्याचे तसेच ते आमनेर (ता. वरुड, जिल्हा अमरावती) येथून खरेदी केल्याचे सलीमने पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी सलीमविरुद्ध  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ / गोवंश हत्याबंदी कायदा, मार्च २०१५ कलम ५ (क) अन्वये गुन्हाही नोंदविला होता. विशेष म्हणजे, मांस गायीचे असो की बैलाचे, ते बाळगणा- यांना कायद्यात सारख्याच शिक्षेची (१ वर्षे कारावास आणि २ हजार रुपये दंड) तरतूद आहे. सलीमजवळ मांस आढळल्याने आणि त्याने तशी कबुलीही दिल्याने त्याला ही शिक्षा होऊ शकते, असे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. 
 
सलीम भाजपामधून निष्कासित
- गोरक्षकांनी सलीमला मारहाण केल्याच्या घटनेनंतर लगेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करीत सलीम हा भाजपाचा कार्यकर्ता व माजी पदाधिकारी असल्याचे म्हटले होते. या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, शनिवारी प्रयोगशाळा तज्ज्ञांच्या अहवालात संबंधित मांस गोवंशाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होताच भाजपानेही आपली भूमिका बदलली व सलीमला पक्षातून निष्कासित केले. सलीमवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी माागणीही जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केली आहे. 
 
आणखी वाचा