शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

ते जगताहेत वंचिताचं जगणं..!

By admin | Updated: June 7, 2015 02:47 IST

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार , तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,

रमेश भोसले, औरंगाबाद - 

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार ,तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,पंढरपूरचा तु सावकार ..करील नामाचा व्यापार ..,गल्लो गल्ली चाळीबोळी घ्या हो घ्या हो देतो आरोळी ..गाढला संतांचा बाजार ..करील नामाचा व्यापार ..खंजिरीवर नाजुक बोटांची खणखणीत थाप देऊन विठ्ठलनामाचा महिमा शाहिरी अंदाजात पेश करताना असंख्य रसिकांना खिळवून ठेवलं आहे ते लोककलावंत मीरा उमप यांनी. वडील वामन उमप यांच्याकडून मिळालेला वारसा पुढे चालू ठेवत अवघ्या महाराष्ट्रभर पारंपरिक लोककलेचं लेणं आपल्या भारूड, भजन, गवळण, गाणी यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पाच दशकांपासून त्या करीत आहेत. निरक्षर असलेल्या मीराताई यांनी सतत साक्षरतेचा वसा गावागावांत पोहोचविला आहे. दिल्ली, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या बहारदार खंजिरी वादनाचे कौतुक केले असून, अनेक नाट्य आणि साहित्य संमेलनेही त्यांनी गाजवली आहेत. मात्र ‘गेल्या सहा महिन्यांपासून कुठलाच कार्यक्रम झालेला नाहीये. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत़ पण मग पुरस्कारांनी पोट भरतं का,’ असा प्रतिप्रश्न त्या विचारतात. राज्य शासनाच्या वतीने अनेक कलाकारांना मानधन दिले जाते़ पण, जे खरे कलाकार पोटाला चिमटा काढून आपली कला जोपसतात त्यांना यापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत मीरातार्इंनी बोलून दाखविली. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असून, कलाकारांची कदर होत नसल्याचे त्या सांगतात.वास्तूशांती, बारसे यासारखे छोटे-मोठे कार्यक्रम करून आपल्या सोबत असलेल्या बारा- तेरा सहकलाकारांचं पथक सांभळतांना ओढाताण होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम नसल्याने कुठेही देवळात, शाळेत कार्यक्रम सादर करून लोकांनी केलेली मदत घेऊनच आला दिवस मागे लोटण्याची वेळ आली आहे. विटभट्टीवर काम करून ऊसतोडणी करताना उसाच्या फडातच तालीम केली असल्याचे त्या सांगायला विसरल्या नाहीत. कार्यक्रम नसले तर कानाकोपऱ्यात धिमडी वाजवित बसले तर तेवढेच लोक पाहतील आणि घरी जातील. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.उद्याच्या भाकरीची चिंता...ज्या ठिकाणी रंगमंचावर कार्यक्रम सादर करत असताना समोरील रसिकांना पाहून आपण अपार धनसंपत्तीचे मालक असल्याचे वाटते.. पण जशी पावलं घराची वाट चालायला लागतात ना तसं उद्याच्या भाकरीची चिंता वाढायला लागते... अन् तार्इंचा कंठ दाटतो!