शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजेच ते, संपत्ती किती विचारायची नसते! उदयनराजेंनी स्वत:च जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 20:30 IST

Udayanraje property: उदयनराजे साताऱ्यातून महायुतीकडून लोकसभा लढवत आहेत. आज त्यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी यामध्ये संपत्ती घोषित केली आहे.

अवघ्या महाराष्ट्राच्या राजाकडे किती संपत्ती असेल, विचारायची असते का? यंदा लोकसभा निवडणुकीत छत्रपती घराण्यांकडून दोन उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडून उभे आहेत. एक कोल्हापूरला दुसरे साताऱ्यात. पैकी कोल्हापुरच्या शाहु महाराजांनी आपली संपत्ती घोषित केली आहे. राहिली होती ती उदयनराजेंची. आज उदयनाराजेंनीही आपली संपत्ती घोषित करून टाकली आहे. 

उदयनराजे साताऱ्यातून महायुतीकडून लोकसभा लढवत आहेत. आज त्यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी यामध्ये संपत्ती घोषित केली आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी २९६ कोटी रुपये संपत्ती जाहीर केली होती. उदयनराजेंनीही तेवढीच संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. उदयनराजे आणि भोसले कुटुंबीयांची एकूण संपत्ती ही 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585  रुपये एवढी आहे. 

उदयनराजेंकडे ३० हजार ८३६ किलोंचे (2 कोटी 60 लाख 74 हजार)  सोने चांदी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ४.७५ किलो सोन्याचे दागिने आहेत. उदयनराजेंच्या कुटुंबीयांकडे 628 ग्रॅम  सोने आहे. 

उदयनराजेंकडे दोन मर्सिडीज, ऑडी, फॉर्चुनर, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, एस क्रॉस आणि जिप्सी अशा कार आहेत. या गाड्यांची किंमत १ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये होते. 

रोख रक्कम किती...उदयनराजेंनी त्यांचे उत्पन्न १६ कोटी ८५ लाख रुपये एवढे दाखविले आहे. परंतु सध्या त्यांच्याकडे रोख 5,85,715 रुपये आहेत. पत्नीकडे 1,35,980 रुपये कुटुंबीयांकडे 3,68,900 रुपये आणि मुलाकडे 22,400 रुपये आहेत. 

जमिन किती...उदयन राजेंकडे १२७ कोटी, ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीची जमिन आहे. कुटुंबाच्या नावावर ५५ लाख रुपयांची जमिन आहे. तर बिगरशेती २० कोटी १४ लाख रुपयांची जमिन उदयनराजेंच्या नावावर आहे. 

कर्ज किती...उदयन राजे जरी राजे असले तरी त्यांच्या डोक्यावर कर्जही आहे. उदयनराजेंवर २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२ रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १६ कोटी ८५ लाख रुपये एवढी आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४