शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

तापीकाठी साकारतेय ‘चेतक टेन्ट व्हिलेज’! फेस्टिव्हलसाठी पर्यटन विभागाचा १० वर्षांचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 04:54 IST

घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’चे रूप घेत असून, त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविण्यात येत असून, त्यासाठी पर्यटन विभागाने १० वर्षांचा करार करून निधीची तरतूद केली आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली सारंगखेडा यात्रा आता ‘ग्लोबल फेयर’चे रूप घेत असून, त्यासाठी पर्यटन विभाग सरसावला आहे. या यात्रेनिमित्ताने खास ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविण्यात येत असून, त्यासाठी पर्यटन विभागाने १० वर्षांचा करार करून निधीची तरतूद केली आहे. यानिमित्ताने येणाºया विविध राज्यांतील व देशातील पर्यटकांसाठी तापी काठावर ‘चेतक टेन्ट व्हिलेज’ साकारले जात आहे.सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने भरणारा घोडेबाजार हा देशातील पाचव्या क्रमांकाचा आहे. आता पहिल्या क्रमांकावर भरारी घेण्यासाठी राज्य पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.पर्यटनमंत्री जयकुमार रावल व स्थानिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षापासून चेतक फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदाही या फेस्टिव्हलला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.त्यासाठी गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन नियोजन केले आहे. ३ डिसेंबर २०१७ ते २ जानेवारी २०१८ असा महिनाभर हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. त्यासाठी महिनाभराकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पर्यटकांसाठी तापी काठावर खास टेन्ट व्हिलेज उभारण्यात येत आहे. ७०पेक्षा अधिक व्हीआयपी टेन्ट येथे उभारण्यात येत असून, त्यात सर्व आलिशान सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय याच व्हिलेज कॅम्पसमध्ये स्पा सेंटर, डायनिंग हाउस, रिसेप्शन हाउस, क्लब यांसह अनेक सुविधा असणार आहेत.पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बोटिंग, स्पीडबोट, पॅरासेलिंग, पॅराग्लाइडिंग, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, हॉर्स राइडिंग यांसह अनेक सुविधाही असणार असल्याने यंदाचा फेस्टिवल हा लक्षवेधी ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र