शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

जनहिताआड येणारे कायदे बदललेच पाहिजेत

By admin | Updated: April 23, 2017 03:22 IST

जवळपास शंभर वर्षे जुन्या असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात कायदे आणि नियमांचा अडसर आपल्या सरकारने दूर केला. जनहिताआड येणारे कायदे आणि नियम हे बदललेच पाहिजेत

मुंबई : जवळपास शंभर वर्षे जुन्या असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात कायदे आणि नियमांचा अडसर आपल्या सरकारने दूर केला. जनहिताआड येणारे कायदे आणि नियम हे बदललेच पाहिजेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पुनर्विकास प्रकल्प कमीतकमी कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. वरळी आणि नायगाव येथील या चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन शनिवारी वरळीतील जांबोरी मैदानावर आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र वायकर आदी मंचावर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, कायदे, नियम हे माणसांसाठी असतात आणि जनहितासाठी ते बदलले पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही काम केले. आधीच्या काळात या चाळींकडे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले गेले. अनेक लांडगे या चाळींकडे सावज म्हणून पाहत होते आणि एकमेकांचे पाय ओढत राहिले. त्यामुळे पुनर्विकास रखडला. आम्ही मात्र, येथील रहिवाशांना उत्तमोत्तम काय देऊ शकू याचाच विचार केला. प्रकाश मेहता, रवींद्र वायकर, स्थानिक आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे आ.कालिदास कोळंबकर, म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी झोकून दिल्याने आणि चाळवासीयांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प आता होऊ घातला आहे. प्रत्येकाला ५०० चौरस फुटांचे हवेशीर घर दिले जाईल. हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम असा पुनर्विकास प्रकल्प असेल. कोणताही बिल्डर नाही, तर म्हाडा हा पुनर्विकास करेल. प्रकल्पाबाबतच्या चाळवासीयांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.चाळकऱ्यांनी दोनअडीच वर्षे अन्यत्र राहून अडचण सहन करावी. त्या काळात हालअपेष्टा झाल्याच, तर आम्हाला शिव्या द्या, पण पुढच्या ५० वर्षांचा विचार करून बांधलेली उत्तम घरे आम्ही तुम्हाला देणारच आहोत, म्हणून आशीर्वाददेखील द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. चाळकरी हे भाडेकरू नसून, येथील घरांचे मालक आहेत आणि बीडीडी चाळ या मुंबईच्या इतिहास व संस्कृतीचा भाग आहेत हे समोर ठेऊनच चांगल्या घरांची उभारणी म्हाडामार्फत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.एखाद्या बांधकामासाठी जादा एफएसआय देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर सरकार बिल्डरधार्जिणे असल्याचा आरोप माध्यमांकडून होतो, पण उपलब्ध जागेचा महत्तम वापर करण्यासाठीचे सूत्र आता जगाने मान्य केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे देण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले. या वेळी सुभाष देसाई, प्रकाश मेहता, रवींद्र वायकर, आ.सुनील शिंदे आदींची भाषणे झाली. आ. मंगलप्रभात लोढा, आ. आशिष शेलार, आ.योगेश सागर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी मंत्री दत्ता राणे, सुनील राणे, शायना एनसी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृहनिर्माण) संजयकुमार आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)श्रेयासाठी युतीमध्ये चढाओढ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. वरळी, नायगाव परिसरात दोन्ही पक्षांनी त्याबाबत बॅनर लावले आहेत. शनिवारी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुभाष देसाई, आमदार सुनील शिंदे यांच्या भाषणावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली, तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा जयघोष केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना, मैदानाच्या बाहेर काही जणांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना पिटाळून लावले.६८ टक्के जमिनीचा वापर चाळकऱ्यांसाठी बीडीडी चाळींच्या जमिनीपैकी ६८ टक्के जमिनीचा वापर हा चाळकऱ्यांची घरे बांधण्यासाठी केला जाईल. केवळ ३२ टक्के जमिनीचा व्यावसायिक वापर केला जाईल. मात्र, आधी चाळकऱ्यांना घरे दिली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.