शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मानवी वस्तीत आला बिबट्या, जाणून कारणे आणि परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 08:50 IST

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर जास्त दिसून येतो. मात्र दिवसेंदिवस शहरीकरण होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येते.   

नारायण बडगुजर पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बिबट्या निदर्शनास आल्याची चर्चा आठवड्याच्या सुरुवातीस झाली. मात्र ते रानमांजर असल्याचा निष्कर्ष वन विभगाच्या अधिकाऱ्यांनी काढला. बिबट्याच्या चर्चेने शहरवासीयांमध्ये घबराट होती. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाचा हा परिणाम. त्याबाबत वन विभागाचे पुणे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांच्याशी साधलेला संवाद.वन्यप्राणी जसे की, बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचे कारण काय? पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर जास्त दिसून येतो. मात्र दिवसेंदिवस शहरीकरण होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येते.   ग्रामीण भागासह शहरातील दाट वस्तीतही बिबटे निदर्शनास का येतात?  बिबटे दाट झाडी किंवा पिकांमध्ये वास्तव्य करतात. जुन्नर आदी भागाप्रमाणे आता पिंपरी-चिंंचवड शहर किंवा पुणे जिल्ह्याच्या इतर भागात अशा पद्धतीचे पिके घेण्याकडे कल वाढत आहे. यात उसाचा समावेश होतो. उसात दडून राहणे बिबट्याला सोयीचे असते. त्यामुळे उसाची शेती ज्या भागात आहे तेथे बिबट्याचे वास्तव्य दिसून येते. आपल्या भागात अशी ऊस शेती वाढत आहे.     वन्यप्राणी व मानवातील संघर्ष कसा टाळता येईल?जंगले तसेच पाण्यांचे स्त्रोतही कमी होत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. अशावेळी त्यांना त्रास न देता त्यांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून द्यावे. विकासाचा अतिरेक थांबविला पाहिजे.प्राण्यांपासून बचाव कसा करावा?शहरात बिबट्या दिसल्यास गोंगाट किंवा गर्दी न करता त्याला निघून जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. त्रास न दिल्यास तो हल्ला करीत नाही.वन्यप्राण्यांना जेरबंद करण्याची यंत्रणा आहे का? पुणे येथे रेस्क्यू पथक आहे. त्याच्या चार तुकड्या आहेत. त्यात ३८ कुशल व प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. वन्यप्राण्याला जेरबंद करणे किंवा तो कोठे अडकला असल्यास त्याची सुटका करणे आदी कामे या पथकाकडून केली जातात. त्यासाठी जाळी, रेस्क्यू व्हॅन यासह प्राथमिक उपचाराची पेटी या पथकाकडे असते. त्यामुळे वन्यप्राणी जखमी असल्यास तत्काळ उपचार करता येतात. या पथकास स्थानिक कर्मचारीही मदत करतात. संबंधितांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित पथक मदत कार्य करते.आपल्या जिवास धोका असल्याचे जाणवल्यावर वन्यप्राणी हल्ला करतात. बिबट्या आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या प्राण्यांवर हल्ला करीत नाही. मात्र गर्दी आणि गोंगाटामुळे तो बिथरतो. भीतीमुळे त्याच्याकडून हल्ला केला जातो. त्यामुळे त्याला त्रास देऊ नये.वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात राहू देणे आवश्यक आहे. त्यांना त्रास न देणे हेच त्यांच्या आणि मानवाच्याही हिताचे आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग