शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून जी घरात नीती तीच राजकारणात पण : ठाकरे सरकारविषयी आंबेडकरांचे सूचक वक्तव्य 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 14, 2021 19:42 IST

राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या हालचाली सुरु आहे...

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आघाडीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत वेळोवेळी आपल्या भूमिका जाहिर देखील केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्याच्या 'CMO' या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून औरंगाबादचा संभाजीनगर व उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आल्यामुळे नामांतराचा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच मुद्द्याचा संदर्भ घेत वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारविषयी सूचक वक्तव्य केले आहे. 

पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, राज्यात औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या हालचाली सुरु आहे. शिवसेनेची औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याबाबत पहिल्यापासून एक ठाम भूमिका आहे. मात्र काँग्रेसने या नामांतराला स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे. घरात सारखे वाद झाले की नेमके काय होते हे आपल्या सगळ्यांनाच चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे जी घरातील नीती तीच राजकारणात देखील अस्तित्वात आहे. यात नवीन काहीच नाही. 

... म्हणून पुण्याला संभाजी महाराजांचं नाव देणे योग्य...  पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. या बोलताना ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पुण्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला जर कोणाचे नाव द्यायचा विचार झाला तर त्यांचे नाव अगदी योग्य राहील, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

''धिस ईज अ राईट टाईम!'' धनंजय मुंडे प्रकरणावर महत्वपूर्ण भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो. त्याच अनुषंगाने आता मुंडे यांनीच 'धिस ईज अ राईट टाईम' म्हणावे असे महत्वपूर्ण विधान केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण