कऱ्हाड : ‘राज्यात शिवसेना भाजपबरोबर सत्तेत गेली तर सुंठीवाचून खोकला गेला,’ अशी खोचक प्रतिक्रिया ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी कऱ्हाड येथे दिली. असे घडल्यास विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार नाही, असे ते म्हणाले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला शरद पवार यांनी आज, मंगळवारी अभिवादन केले़ त्यानंतर वेणूताई चव्हाण ट्रस्ट येथे ते पत्रकारांशी बोलत होते़ पवार म्हणाले, ‘राज्यातील भाजप सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे़ भाजपने कोणाचा पाठिंबा घ्यायचा हे ते ठरवतील़ आम्ही फक्त बाहेरून पाठिंबा दिला आहे़़ शिवसेना जर भाजपबरोबर गेली, तर विरोधी पक्षनेतेपदावरही आमचा दावा असणार नाही़ कारण काँग्रेसपेक्षा एक आमदार राष्ट्रवादीकडे कमी आहे, याची आम्हाला जाणीव आहे़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत़ त्याबाबत आम्ही चिंतन केले आहे़ पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सभासद नोंदणीचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे़ त्यातून संघटना मजबूत करू़’ (प्रतिनिधी)खडसेंच्या वक्तव्यावर मौनआघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचे संकेत नव्या सरकारने दिले आहेत़ याबाबत विचारले असता, ‘नव्या सरकारला यावर फेरविचार करण्याचा अधिकार आहे,’ असे उत्तर पवार यांनी दिले. भाजप सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत बोलणे शरद पवार यांनी टाळले़खडसेंच्या वक्तव्यावर मौनआघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचे संकेत नव्या सरकारने दिले आहेत़ याबाबत विचारले असता, ‘नव्या सरकारला यावर फेरविचार करण्याचा अधिकार आहे,’ असे उत्तर पवार यांनी दिले. भाजप सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत बोलणे शरद पवार यांनी टाळले़
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही
By admin | Updated: November 25, 2014 23:44 IST