शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना मिळाली होती...पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:05 IST

नागपूरहून मुंबईच्या दिशेने दुरांतो एक्स्प्रेस येत असताना आसनगाव आणि वाशिंद दरम्यान रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. आसनगाव येथून सुटलेल्या लोकलच्या मोटरमनने ही सूचना स्टेशन मास्तरला दिली होती

महेश चेमटे मुंबई : नागपूरहून मुंबईच्या दिशेने दुरांतो एक्स्प्रेस येत असताना आसनगाव आणि वाशिंद दरम्यान रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. आसनगाव येथून सुटलेल्या लोकलच्या मोटरमनने ही सूचना स्टेशन मास्तरला दिली होती. स्टेशन मास्तरने गेटमनला खांब क्रॅमांक ८३-१० जवळील रुळावरील मातीचे प्रमाण पाहण्याच्या सूचना केल्या. त्याचवेळी गेटमनने संबंधीत सुपरवायझरला माती आल्याची माहिती दिली होती. आज माती काढण्याचे काम करू, असे उत्तर पीडब्लुआयच्या सुपरवायझरने गेटमनला दिले होते. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांत या घटना घडल्या. याच दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.आसनगाव स्थानकाच्या पुढे एका वळणाजवळ मुसळधार पावसामुळे माती रेल्वे रुळावर आली होती. सुमारे ८० किमी प्रतितास या वेगाने ही एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने येत होती. वळण पूर्ण केल्यानंतर रेल्वे रुळावर मोठ्याप्रमाणात मातीचा ढीग पाहून एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवत आपलात्कालीन ब्रेक कार्यान्वित केले. या ब्रेकमुळे एक्स्प्रेसच्या इंजिन रुळाबाहेर फेकले गेले. मुसळधार पाऊस आणि शेजारील डोंगरावरील भुसभुशीत झालेली माती यामुळे एक्स्प्रेसचे डबे मातीत रुतून रुळावर आडवे झाले.ही दुर्घटना भयानक असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघाताची चौकशी व जखमींना मदत मिळावी अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करू.- कपिल पाटील,स्थानिक खासदारगाडी भरधाव वेगात असताना अचानक रेल्वे ट्रॅकवर माती व दगडांचा ढिगारा आला. ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला; तोवर इंजिनसह ४ डबे उलटले.- उमेश गरूड,प्रत्यक्षदर्शी प्रवासीसहा-साडेसहाच्या आसपास अचानक झटका लागला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. गाडी थांबली आणि सह प्रवाशांनी बाहेर डोकावले असता अपघात झाल्याचे समजले. आम्ही सगळे अपघातातून सुखरूप बचावलो हेच नशीब. - तृप्ती सोनक, प्रवासी

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात