शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशीचा देखावाच; सरपंच, सदस्य सुटताहेत सहीसलामत

By समीर देशपांडे | Updated: February 4, 2025 16:44 IST

चौकशीच्या फाईलींचे गठ्ठे तेवढे वाढत निघाले 

राजकीय हस्तक्षेप, पैसे खाण्याच्या शोधल्या जाणाऱ्या संधी, नियमाने काम करताना त्यातूनच निर्माण होणारे प्रश्न यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल सार्वत्रिक तक्रारी होण्याचे प्रमाण वाढले. चौकशी आणि कारवाईची प्रक्रिया अतिशय वेळखाऊ, भ्रष्ट आणि राजकारण्यांच्या सोयीची असल्याने साहजिकच यातून फारसे काहीच निष्पन्न होत नाही असे राज्यपातळीवरील चित्र आहे. पंचायत राज व्यवस्थेतील शेवटच्या संस्थेमध्ये सुरू असलेल्या सावळा गोंधळाची आणि त्यावरील उपाययोजना सुचवणारी मालिका आजपासून..समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे पंधराव्या वित्त आयोगातून मोठा निधी ग्रामपंचायतींना मिळत असल्याने गैरकारभारही वाढला आहे. राजकारणामुळे तक्रारीही वाढल्या आहेत. परंतु चौकशीच्या फाईलींचे गठ्ठे तेवढे वाढत निघाले असून बोगस कायद्याअभावी प्रत्यक्ष कारवाईला विलंब होत आहे. चौकशीचे अहवाल, जिल्हा, विभागीय पातळ्यांवरील सुनावण्यांच्या तारखा आणि कारवाईला स्थगिती यामुळे अपात्र सरपंचही पदावर बसून काम करत राहात असल्याने हा ग्रामविकासचा बोगस कायदाच बदलण्याची गरज आहे.ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रारंभी सरपंच, ग्रामसेवकाकडे तक्रार केली जाते. तिथे दखल घेतली नाही तर गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार जाते. प्रकरण छाेटे असेल आणि फार राजकीय संबंध नसेल तर त्याच पातळीवर तो विषय संपवला जातो. परंतु प्रकरण मोठे असेल, कारवाईत अडचण असेल तर तक्रारदाराला जिल्हा परिषदेत जाण्याचा सल्ला दिला जातो. या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाते आणि इथूनच मग चौकशीचा फेरा सुरू होतो आणि तो किमान एक आणि अधिकाधिक दोन, अडीच वर्षे चालते. (क्रमश:)

चौकशीचे टप्पे

  • ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, असे आदेश सीईओ देतात.
  • गटविकास अधिकारी पंचायत विस्तार अधिकाऱ्याकडून चौकशी करतो.
  • त्यांना झेपणारे प्रकरण नसेल, दबाव येत असेल तर मोघमात अहवाल जिल्ह्याला पाठवला जातो.
  • अहवाल मोघमात असल्याने सीईओ पुन्हा स्वयंस्पष्ट अहवाल द्या म्हणून पुन्हा प्रकरण खाली पाठवतात.
  • मग गटविकास अधिकारी दबावानुसार कसरत करत सरपंच, ग्रामसेवकांची नेमकी ताकद जोखून अहवाल देतात.
  • मग सीईओ एक, दोन सुनावण्या घेतात आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३९ नुसार सरपंच किंवा सदस्याला अपात्र ठरवण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून निर्देश मागवतात.
  • मग विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन अहवाल पाठवण्याचे निर्देश देतात.
  • सीईओंकडील सुनावणी सुरू होते आणि इथे वकील बाजू मांडतात. दोन, चार सुनावण्या होतात आणि मग अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला जातो.
  • यानंतर काही महिन्याने निर्णय होतो. सरपंच किंवा सदस्य अगदीच काही गंभीर असेल तर अपात्र ठरवला जातो.
  • यानंतर ग्रामविकास विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे अपिलाची संधी असल्याने तसे अपील केले जाते.
  • पक्षीय राजकारण आणि अहवाल पाहून लवकर निर्णय द्यायचा की नाही हे ठरवले जाते आणि राजकीय सोय पाहून मग निर्णय दिला जातो.
  • अपात्र झालेला पदाधिकारी पुन्हा उच्च न्यायालयात जातो आणि मग पुन्हा एकदा सुनावण्यांचा खेळ सुरू राहतो.

तक्रारींचे स्वरूपग्रामपंचायतीमधील अतिरिक्त दराची बोगस खरेदी, काम न करता पैसे उचलणे, ठिकाण एक दाखवून दुसरीकडेच काम करणे, पै पाहुण्यांना ठेकेदारी देणे, रोख पैशांनी बिले देणे, प्रोसिडिंग कोरे सोडणे, न लिहणे, सह्या नसणे, बैठका न घेणे, गायरानातील अतिक्रमणे, घरफाळा न भरणे, निविदा प्रक्रिया योग्य पध्दतीने न वापरता ठेका देणे अशा एक ना हजार तक्रारी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत होत असतात. परंतु तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सध्याची कार्यपध्दती उपयुक्त ठरत नसल्याचे भीषण वास्तव आहे.

  • राज्यातील जिल्हा परिषदा ३४
  • राज्यातील पंचायत समित्या ३५१
  • राज्यातील ग्रामपंचायती २८,०००
टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच