शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये : अनु आगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:03 IST

राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली...

ठळक मुद्देप्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यत्व दडलेले मी कधीच टीव्ही पाहत नाही, तर पुस्तकांमध्ये रमते. आयुष्यात किंवा व्यवसायात चढता आलेख, लाभ महत्वाचा कोठे स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायचा, हे आपले आपणच ठरवायला हवे.

पुणे : राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली. संसदेत कोणीही एकमेकांचा आदर करत नाही. शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत उद्योजिका आणि समाजसेविका अनु आगा यांनी निशाणा साधला. मतदारांनी योग्य आणि सक्षम लोकप्रतिनिधींचीच निवड करायला हवी. आपण ज्यांना निवडून दिले आहे, त्यांना परखडपणे प्रश्न विचारायला हवेत. योग्य राज्यकर्ते असतील तरच देशाचे भविष्य उज्ज्वल असेल, असा सल्लाही त्यांनी दिला.जनसेवा फौंडेशनतर्फे मीट द स्टॉलवर्ट, भेटू या एका दिग्गजाला या कार्यक्रमांतर्गत अनु आगा यांची प्रकट मुलाखत पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यभेचे खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यध्यक्षस्थानी विकफिल्ड ग्रुपचे चेअरमन बहारी बी.आर. मल्होत्रा होते. यावेळी डॉ. शां.ब. मुजुमदार, जॅकी मल्होत्रा, कृष्णकुमार गोयल, मोहन जोशी, विजय सराफ, संजय सिन्हा, विनोद शहा, राजेश शहा उपस्थित होते. आगा म्हणाल्या, आपण नेहमीच स्वत:ला कमी लेखतो. आधी स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यत्व दडलेले असते. या असामान्यत्वाचा शोध आपणच लावायला हवा. त्याचवेळी मी असामान्य आहे, ही भावना आपल्यावर स्वार होता कामा नये. आयुष्यात किंवा व्यवसायात चढता आलेख, लाभ महत्वाचा असतो. मात्र, केवळ त्यावर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. आयुष्याचे ध्येय जास्त महत्वाचे असते. त्यामुळे कोठे स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायचा, हे आपले आपणच ठरवायला हवे.मी कधीच टीव्ही पाहत नाही, तर पुस्तकांमध्ये रमते. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा प्रत्येकाचे आयुष्य जगू शकत नाही. मात्र, हा अनुभव पुस्तकांमधून मिळतो. पुस्तक हे सर्वात छान मित्र असतात. माझ्यावर महात्मा गांधीजी आणि माझे पती रोहिंग्टन आगा यांचा खूप प्रभाव आहेह्ण, याकडेही आगा यांनी लक्ष वेधले.जनसेवा फाऊंडेशनचे विनोद शहा यांनी प्रास्ताविक केले. आगा यांची मुलाखत नीरजा आपटेआणि डॉ. वर्धमान जैन यांनी घेतली. प्रा. जे.पी. देसाई आणि विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेParliamentसंसदPoliticsराजकारणGovernmentसरकार