शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

...तर ठाकरे गटात बदल झाले पाहिजेत; पक्षातून पदाधिकारी बाहेर पडण्यावर नीलम गोऱ्हे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:14 IST

मागील महिन्यात नाशिकच्या १२ माजी नगरसेवक, जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता.

मुंबई - नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिंदे गटात प्रवेश केलेल्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. कुणीतरी येडेगबाळे पकडायचे आणि प्रवेश करून घ्यायचा अशा शब्दात संजय राऊतांनी या पक्षप्रवेशाची खिल्ली उडवली तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काही बदल आवश्यक असतील तर ते झाले पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली. 

विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कमीत कमी लोक पक्ष सोडून जातील यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरीही आम्ही कुठे कमी पडत असू तर याबाबत जरूर काही बदल झाले पाहिजेत असं मला वाटतं असं त्यांनी सांगितले आहे. 

ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटात मागील महिन्यात नाशिकच्या १२ माजी नगरसेवक, जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतरही ठाकरे गटातील गळती थांबत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असल्यानं त्याचा फटका ठाकरे गटाला बसत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र त्यात ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेतील असं सांगण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी शिवसेनेसाठी तळागाळात काम करणारे पदाधिकारीच शिंदे गटात प्रवेश करत असल्याने निश्चित ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला अपयश येत असल्याने त्याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होतील असं चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे. 

'त्या' पदाधिकाऱ्यांची नावेही माहिती नाहीतजे येडेगबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून पक्षप्रवेश करून घेतात. नाशिकमधील शिवसेना जशीच्या तशी आहे. २-४ दलाल ठेकेदार तिकडे गेले असतील. जमिनीवरचा शिवसैनिक आणि शिवसेना जागेवरच आहेत. जे कुणी गेलेत त्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. मला माहिती नाहीत अशा शब्दात संजय राऊतांनी ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे