शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कर्नाटक पोलिसांनी नाकारलेला मृतदेह अखेर क-हाडात विसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 23:04 IST

एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था... सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर क-हाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था,’ अशी भावनिक प्रतिक्रिया कºहाडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलीस दलातीलच जबाबदारी झटकू पाहणाऱ्या एका माणुसकीशून्य अधिकाऱ्यामुळे एका निष्पापसनदशीर कागदपत्रे असताना आणि मृत व्यक्ती कर्नाटक राज्याची असतानाही 'कर' नाटकी प्रवृत्ती दाखवत या पोलिसांनी पुन्हागुजरातमध्ये दोन दिवसांपूर्वी झाला होता मृत्यू; कोगनोळी टोलनाक्यावरुन परत पाठवले, कोल्हापूरनेही केली होती दफनविधीची तयारी

क-हाड : मृत्यूनंतर यातना संपतात, असं म्हटलं जातं; पण गुजरातमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या देहाला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागल्या. दोन दिवस दोन राज्यांमध्ये फिरणारा हा मृतदेह सोमवारी रात्री अखेर महाराष्ट्रात पोहोचला आणि क-हाडच्या मातीत या देहाचा दफनविधी पार पडला.

'असिफ लतिफ सैय्यद (वय ५४) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. असिफ सैय्यद हे कामानिमित्त गुजरातमधील भरूचमध्ये राहण्यास होते. कर्नाटकातील कारवार हे त्यांचे मूळगाव. मात्र, कामानिमित्त असिफ भरूचमध्येच एकटेच राहत होते. रविवारी (दि.१७) त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जवळ कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक यांनीच शवविच्छेदन आणि इतर कागदोपत्री सोपस्कार पार पाडले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक मकबूलसह ते भरूचमधून असिफ सैयद यांचा मृतदेह घेऊन कारवारला जाण्यासाठी निघाले. सोबत आवश्यक ती कागदपत्रे असल्यामुळे वाटेत त्यांना कोणीही अडविले नाही. मात्र, सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडविली.

सामाजिक कार्यकर्ते मुबारक व रुग्णवाहिका चालक मकबुल यांनी सर्व कागदपत्रे पोलिसांना दाखवली. तसेच सत्यस्थिती सांगितली. मात्र, पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता रुग्णवाहिका परत गुजरातला न्या, अशी आडमुठी भूमिका घेतली. अखेर त्या दोघांनी कोल्हापूरच्या मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची कल्पना दिली. गणी आजरेकर यांनी तातडीने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना फोन करून ही घटना सांगितली. अखेर मृत असिफ सैय्यद यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन कोल्हापूरच्या बागल चौकातील कब्रस्तानात मृतदेहाचा दफनविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुग्णवाहिका कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. मात्र, किणी टोलनाक्यावर पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवली. त्यांनी रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस वाहन पाठवून ती रुग्णवाहिका पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणून सोडली. या सर्व प्रकारानंतर व्यथित झालेल्या मकबूल आणि मुबारक यांनी गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला.

सर्वच वाटा बंद झाल्यामुळे अखेर आजरेकर यांनी क-हाडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांच्याशी संपर्क साधला.नगरसेवक पटवेकर यांनी क-हाडातील पोलिसांशी चर्चा करून मुबारक आणि मकबूल यांना असिफ सैयद यांच्या पार्थिवासह क-हाडला येण्यास सांगितले. कोल्हापूरचे मौलाना मुबीन, गणी आजरेकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर असिफ सैय्यद यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे क-हाडमध्ये पोहोचला. त्यानंतर इस्लाम रितीरिवाजाप्रमाणे क-हाडच्या कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. यासाठी क-हाडचे हाजी बरकत पटवेगार, साबीर मुल्ला, इरफान सैयद, झाकीर शेख यांनीही सहकार्य केले.

 

  • आजरेकर यांनी तेथील सहायक पोलिस निरीक्षक अनिल कोळेकर यांच्याशी मी बोलतो, त्यांना फोन द्या असे सांगितले .पण कोळेकर यांनी त्यांचा फोन तर घेतला नाहीच, उलट मुबारक आणि मकबूल यांना रूग्णवाहिकेत बसवून पाठीमागे एक पोलीस वाहन पाठवून देत त्यांना पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या ह्ददी बाहेर जाण्यास भाग पाडले .पुढे सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील एका पोलीस चौकी च्या दारात थांबून त्यांनी पुन्हा आजरेकर यांच्याशी संपर्क साधला .त्यांना हकीकत सांगितली .आजरेकर यांनी जिल्हा पोलिस प्रमुख देशमुख यांना याबाबत सांगितले .देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक कोळेकर यांना विचारणा केली असता त्यांनी चक्क आपल्या वरिष्ठांची दिशाभूल करून वेळ मारून नेली

एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था...सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर कºहाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था,’ अशी भावनिक प्रतिक्रिया क-हाडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांनी दिली.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीमPoliceपोलिसKarnatakकर्नाटक