शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

संबंधांवर वादाचे सावट नको

By admin | Updated: June 15, 2015 02:22 IST

भारत व चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हायचे असल्यास या संबंधांवर वाद विषयांचे सावट पडता कामा नये, असे प्रतिपादन चीनच्या नॅशनल

मुंबई : भारत व चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हायचे असल्यास या संबंधांवर वाद विषयांचे सावट पडता कामा नये, असे प्रतिपादन चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झँग डेजियांग यांनी केले. तर राज्यातील विविध प्रांतांचा चीनमधील वेगवेगळ्या प्रांतांशी विकासाच्या दृष्टीने संबंध वृद्धिंगत होऊन दोन्ही देशांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. बँक आॅफ चायनाची शाखा लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.रविवारी सह्याद्री अतिथीगृहात अध्यक्ष झँग डेजियांग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टमंडळासमवेत चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चीनला भेट देण्याची संधी मिळाली तेव्हा तेथील पायाभूत सुविधा आणि विकासाची गती पाहून आपण खूप प्रभावित झालो. विशेषत: चीनमधील ४२ किलोमीटर्सचा अतिशय कमी कालावधीत पूर्ण करण्यात आलेला ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प पाहून अशाच पद्धतीने मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक बांधून पूर्ण करण्यात आपण चिनी कंपन्यांची मदत घेणार आहोत. विकासाच्या दृष्टीने दोन देशांमध्ये सामंजस्य करार होतात, मात्र चीनच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राने चीनमधील दुसऱ्या प्रांतांशी विकासाबाबत चर्चा करून एक नवे पर्व सुरू केले आहे. यामुळे दोन्ही देशांतील विविध प्रांतांमध्ये एक नवे सांस्कृतिक, औद्योगिक वातावरण निर्माण होईल. (विशेष प्रतिनिधी)