शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:53 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्याचे म्हटले आहे.नितीशकुमार आणि शरद पवार ‘एनडीए’त आल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात जेडीयु आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थान मिळू शकते, असे वृत्त पसरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, या शक्यतांना भाजपामधून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. तर, खा. सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताचे तात्काळ खंडण करत ही अफवा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनीही टिष्ट्वट करून ‘एनडीए’त जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याचा इन्कार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे सख्य जगजाहीर आहे. पवारांचे बोट धरूनच आपण राजकारणात आल्याचे मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्याऐवजी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. तर आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात आयोजित केलेल्या विरोधकांच्या महारॅलीत शरद पवार यांच्याऐवजी तारिक अन्वर यांनी हजेरी लावली. दिल्लीत चर्चेमागे ही पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येते.आपण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरविण्याचे हे उद्योग नेमकं कोण करतं, हेच कळत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात अथवा एनडीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -सुप्रिया सुळे, खासदार

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीBJPभाजपा