शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या अंड्याच्या दाव्यात किती तथ्य; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 12:10 IST

बाजारात प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची अफवा

पुणे: बाजारात प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा खुलासा ‘नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी’नं (एनईसीसी) केला. यासाठी एनईसीसीनं एक डेमोदेखील दाखवला.  कोणतंही अंड फोडलं की, त्याच्या आत कवचाला चिकटलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो. अंड शिळं असल्यास हा पापुद्रा प्लास्टिकसारखा दिसतो. त्यामुळे आपल्याला ते अंड प्लास्टिकचं असल्याचं वाटतं, असं एनईसीसीनं सांगितलं. याबद्दल एनईसीसीकडून एक प्रात्यक्षिकदेखील दाखवण्यात आलं. प्लास्टिकसारखा दिसणारा अंड्याचा पापुद्रा आगीवर पकडल्यास तो सहजासहजी जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेतं. त्यामुळे प्लास्टिकचं अंड ही केवळ अफवा आहे. अंड्यांबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला.प्लास्टिक अंड्यांच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसंच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मुंबई तसेच ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी ‘नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी’नं पुढाकार घेत प्लास्टिक अंड्यांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं.